शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 06:23 IST

Mankhurd Shelter Home Party Case: मानखुर्द येथील गतिमंद मुलांच्या बालगृहात डिसेंबर २०१२मध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या पार्टीबद्दल उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.

मुंबई: मानखुर्द येथील गतिमंद मुलांच्या बालगृहात डिसेंबर २०१२मध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या पार्टीबद्दल चिल्ड्रेन्स एड सोसायटी (सीएसी) आणि चाइल्ड वेल्फअेर कमिटी (सीडब्ल्यूसी)च्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, हे ११ वर्षांनंतरही सांगू न शकल्याबद्दल राज्य सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असा संताप उच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केला. या पार्टीमध्ये २० विशेष मुलींना बारबालांबरोबर डान्स करण्यास भाग पाडण्यात आले होते. 

आम्ही ११ वर्षे जनहित याचिका प्रलंबित ठेवू शकत नाही. कारवाई केली आहे की नाही, तेवढेच सांगा, असे मुख्य न्या. आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने बजावले. त्यावर सरकारी वकिलांनी माहिती घेण्यासाठी  मुदत मागितली. त्यावर, “यासाठी ११ वर्षे घेतली? तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांची लाज वाटली पाहिजे.  काय कारवाई करण्यात आली ते पाहतो, हे सांगण्याची तुमची आता हिंमत कशी होते? म्हणजे आणखी २५ वर्षे आम्ही याचिका प्रलंबित ठेवावी का? याचिका प्रलंबित ठेवण्याचे परिणाम तुम्हाला माहीत आहेत का?” असा संताप न्यायालयाने व्यक्त केला. 

बारबालांसोबत विशेष मुलींना नाचवलेया पार्टीसाठी दारू आणण्यात आली. बारबालांना बोलावण्यात आले आणि तोकड्या कपड्यांत डान्स करणाऱ्या बारबालांबरोबर २० विशेष मुलींना पहाटे ३:०० वाजेपर्यंत डान्स करण्यास भाग पाडण्यात आले होते, असे जनहीत याचिकेत म्हटले होते. 

२०१४ मध्ये जनहित याचिका दाखलपार्टीनंतर ११ महिन्यांनी ही घटना उघडकीस आली होती. यासंदर्भात २०१४मध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेद्वारे अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या.  त्यापैकी सीएसी आणि सीडब्ल्यूसीच्या अधिकाग़्यांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीचाही समावेश होता. याबाबत अनेक खंडपीठांनी वेगवेगळे निर्देश दिले, तरीही याचिका अजूनही प्रलंबित आहे.

उच्च न्यायालयाने फटकारलेतुम्ही चुकीचे वागणाऱ्यांना संरक्षण देऊ शकत नाही. काय कारवाई केली, हे तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला कारवाई करावीच लागेल, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने फटकारले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईmankhurd-shivaji-nagar-acमानखुर्द शिवाजी नगरMaharashtraमहाराष्ट्र