शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 19:26 IST

मुंबई- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. 

मुंबई- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कोकिळाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान आज संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून ते आजारी असल्यानं कोकिळाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही तीन मुलं आहेत. शशी कपूर यांना 2014ला फुप्फुसामध्ये जंतुसंसर्ग झाला होता. त्याआधी त्यांची बायपास सर्जरी देखील करण्यात आली होती. त्यानंतरच त्यांची तब्येत खालावत राहिली. शशी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे. शशी कपूर यांनी आतापर्यंत 160 चित्रपटांत काम केलंय. त्यात 148 हिंदी आणि 12 इंग्रजी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचा जन्म 18 मार्च 1938मध्ये कोलकातामध्ये झाला होता. 60 आणि 70च्या दशकात जब जब फूल खिले, कन्यादान, शर्मिली, आ गले लग जा, रोटी कपडा और मकान, चोर मचाए शोर, दीवार, फकिरा यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले. शशी कपूर यांनी आजवर दीवार, सत्यम शिवम सुंदरम, कभी कभी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण नव्वदीच्या दशकापासून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे कमी केले होते. 1948मध्ये पत्नी जेनिफर यांचा कर्करोगाच्या आजारानं मृत्यू झाल्यानंतर शशी कपूर काहीसे एकटे एकटेच राहायला लागले होते. त्याच दरम्यान त्यांची प्रकृती खालावली. आजारपणामुळे शशी कपूर हे चित्रपटसृष्टीपासून दूर राहिले. 2011मध्ये शशी कपूर यांना भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. 2015मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. कपूर परिवारातील ते असे तिसरे व्यक्ती होते की ज्यांनी एवढे पुरस्कार मिळवले होते.एक अदबशीर आणि सज्जन व्यक्तिमत्त्व असलेले अभिनेते हरपले- विनोद तावडेज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या निधनामुळे आपल्या जिवंत अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीवर वेगळी ठसा उमटविणारे अभिनेते आपण गमावले आहेत. शशी कपूर नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यांपुढे येतो तो देखणा चेहरा, घरंदाज, अदबशीर आणि अगदी सज्जन व्यक्तिमत्त्व. प्रामाणिक, लाघवी, शांत, संयमी अशा विविध भूमिकेतून ते रसिकांच्या नेहमीच स्मरणात राहतील, या शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी शोक व्यक्त केला आहे.

टॅग्स :Shashi Kapoorशशी कपूर