शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

‘बोलावा विठ्ठल’ची सुरेल मेजवानी!

By admin | Updated: July 11, 2017 01:01 IST

‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’, ‘पदमनाभा नारायणा’, ‘संत भार पंढरीचा’ असा एकाहून एक अभंगांनी सजलेला स्वरमंच, अशा भक्तिमय वातावरणात रसिकांची ब्रह्मानंदी टाळी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘राम कृष्ण हरी’च्या गजरातून भक्तिरसात न्हाऊन निघालेले रसिक... किशोरी आमोणकर, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. भीमसेन जोशी यांच्या एकमेवाद्वितीय रचना सादर करीत गायकांनी वातावरणात भरलेले भक्तीचे रंग... ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’, ‘पदमनाभा नारायणा’, ‘संत भार पंढरीचा’ असा एकाहून एक अभंगांनी सजलेला स्वरमंच, अशा भक्तिमय वातावरणात रसिकांची ब्रह्मानंदी टाळी लागली.निमित्त होते ‘पंचम निषाद क्रिएटिव्हस’ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि लोकमत समूह माध्यम प्रायोजक असलेल्या ‘बोलावा विठ्ठल..’ या कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या संगीतसंध्येचे. गेली १२ वर्षे पंचम निषादतर्फे आषाढी एकादशीचे औचित्य साधूून ‘बोलावा विठ्ठल’ अभंगमय संध्येचे आयोजन केले जात आहे. या मैफलीत सुप्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर, पं. जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित व आनंद भाटे यांनी अभंगसेवा सादर केली. या वर्षीचा कार्यक्रम गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांना समर्पित करण्यात आला होता. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पांडुरंगाचे निवासस्थान म्हणजे पंढरपूर. प्रतिवर्षी आषाढी एकादशीनिमित्त लाखो विठ्ठलभक्त वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. त्या वेळी ते विठ्ठलाच्या स्तुतीत अनेक अभंग गात असतात. ते सारे अभंग १२ ते १९ व्या शतकात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गोराकुंभार, संत जनाबाई यांनी रचलेले आहेत. ‘बोलावा विठ्ठल’ या संगीत मैैफलीमध्ये या अभंगांच्या आठवणींना उजाळा मिळाला. रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे आणि पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी ‘जय जय राम कृष्ण हरी’मधून हरिनामाचा गजर करून संगीतसंध्येचा श्रीगणेशा केला. रघुनंदन पणशीकर यांनी ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’, ‘पद्मनाभा नारायणा’ या रचना सादर करत रसिकांना स्वरांमधून विठूरायाचे दर्शन घडवले. देवकी पंडित यांनी ‘मजवरी करी कृपा’, ‘संत भार पंढरीचा’ हे अभंग गाऊन वातावरण प्रफुल्लित केले. या रचनांना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आनंद भाटे यांनी ‘जोहार माय बाप’, ‘अगा वैैकुंठीचा राया’ हे अभंग सादर केले. पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी स्वरचित ‘सौैभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’, ‘विठ्ठलैैया विठ्ठलैैया’ हे कानडी अभंग सादर केले. साई बँकर आणि भरत कामत (तबला), प्रकाश शेजवळ (पखवाज), महेंद्र शेडगे (तालवाद्य), एस.आकाश (बासरी), निरंजन लेले (हार्मोनियम) यांनी सुरेख साथसंगत केली. >तरुण पिढीला संस्कृती-परंपरेच्या जवळ आणण्याचा प्रयत्नपंचम निषाद संस्थेचे अध्यक्ष शशी व्यास म्हणाले, ‘मी काही वर्षांपूर्वी किशोरीतार्इंना भेटलो होतो. ज्याप्रमाणे संतवाणीला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळतो, त्याप्रमाणे अभंगवाणीला मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्या वेळी कार्यक्रमाचे ‘तोचि नादू सुखरू’ हे शीर्षक बदलून सोपे करण्याचे सुचवले. तुम्ही गायला तयार असाल तर मी हा कार्यक्रम करायला तयार आहे,’ असे मी म्हटल्यावर ‘बोलावा विठ्ठल’ या संगीत मैफलीची सुरुवात झाली. २००५ मध्ये पहिली मैफल रंगली. या वेळी किशोरीतार्इंनी गायन केले’. या आठवणींना उजाळा देत, व्यास म्हणाले, ‘भारतीय भक्तिसंगीत हे सगुण-निर्गुण असे विभागलेले आहे. परंतु, अभंग प्रकार या दोहोंचा उत्कृष्ट संगम आहे. ‘बोलावा विठ्ठल’ हा एक असा प्रयत्न आहे, यामुळे तरुण पिढीला आपल्या संस्कृती व परंपरेच्या अधिक जवळ आणेल. शिवाय, महाराष्ट्रातील महान संत संत नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर आणि बहिणाबाई यांनी अभंगातून जो संदेश दिला आहे, तोही तरुणाईपर्यंत पोहोचेल.’