शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

नगरमध्ये बोगस मतपत्रिका सापडल्या

By admin | Updated: May 25, 2016 00:57 IST

अखिल भारतीय जैन श्वेतांबर कॉन्फरन्सच्या निवडणुकीनंतर येथील मतदान केंद्राच्या बाहेर कोऱ्या आणि शिक्के मारलेल्या मतपत्रिका सापडल्याने मंगळवारी गोंधळ उडाला.

अहमदनगर : अखिल भारतीय जैन श्वेतांबर कॉन्फरन्सच्या निवडणुकीनंतर येथील मतदान केंद्राच्या बाहेर कोऱ्या आणि शिक्के मारलेल्या मतपत्रिका सापडल्याने मंगळवारी गोंधळ उडाला. २५० मतपत्रिका पोलिसांनी जप्त केल्या असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय अध्यक्ष, चतुर्थ झोन व पंचम झोन प्रांतिय अध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या २४ जागांसाठी रविवारी नगरमधील बडीसाजन मंगल कार्यालयात मतदान झाले. सोमवारी दुपारी चार वाजता मतमोजणी प्रक्रिया संपली. यामध्ये जय जिनेंद्र ग्रुप पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी विजय मिळविला. मंगळवारी दुपारी मतदान केंद्राच्या बाहेर कोऱ्या व शिक्के मारलेल्या मतपत्रिका सापडल्या. प्रत्येक मतपत्रिका पोलिसांनी गोळा केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. डी. डी. खाबिया यांना पोलिसांनी पाचारण केले. मतपत्रिकांची संयुक्तपणे तपासणी केली.निवडणुकीमध्ये जशा मतपत्रिका छापल्या होत्या, तशाच मतपत्रिका छापून, झेरॉक्स करून त्यावर शिक्का मारून त्या मतदान केंद्राबाहेर फेकण्यात आल्या. हा खोडसाळपणाचा प्रकार आहे. मतदानासाठी एक लाख मतपत्रिका छापल्या होत्या. प्रत्येक मतपत्रिकेवर फुली असलेला शिक्का आणि त्यावर निवडणूक प्रक्रियेत असलेल्या प्रोसेडिंग आॅफिसरची स्वाक्षरी होती. सापडलेल्या मतपत्रिकांवर फक्त शिक्का होता आणि तो बनावट होता. - डी. डी. खाबिया,निवडणूक अधिकारी