शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

विद्यार्थिनीची हत्या करणाऱ्याचा मृतदेह काढला

By admin | Updated: August 27, 2014 01:01 IST

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची अमानुष हत्या केल्यानंतर स्वत:ही रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्या आरोपीचा मृतदेह पोलिसांनी उकरून काढला. आज या घडामोडीमुळे हे थरारक

एकतर्फी प्रेमाचा थरार : हत्येनंतर आत्महत्यानागपूर/खापरखेडा : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची अमानुष हत्या केल्यानंतर स्वत:ही रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्या आरोपीचा मृतदेह पोलिसांनी उकरून काढला. आज या घडामोडीमुळे हे थरारक प्रकरण अधिकच गडद झाले. हर्षल खुशाल गुरडकर (वय २०) असे मृत आरोपीचे नाव आहे. तो पारशिवनी तालुक्यातील सिंगोरी येथील रहिवासी होता. गावातीलच प्रिया तुळशीराम रांगणकर (वय १८) या युवतीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. मात्र, तिच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तो चडफडत होता. प्रिया खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात बारावीला शिकत होती.गुरुवारी (२१ आॅगस्ट) कॉलेज सुटल्यानंतर प्रिया मैत्रिणींसोबत खापरखेडा येथील रेल्वे चौकी परिसरातून शिकवणीला जात होती. आरोपी हर्षलने मोटरसायकलवरून (एमएच-४०/एस-८५९३) तिच्याजवळ आला. त्याने तिच्यावर चाकूचे सपासप वार केले. गंभीर जखमी झाल्याने प्रियाला कामठीच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. शनिवारी मध्यरात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या थरारक घटनेमुळे सिंगोरी पारशिवनी पंचक्रोशीत प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला. आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाईची मागणी होऊ लागली. संतप्त नागरिकांनी त्यासाठी खापरखेडा पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन आपला रोष व्यक्त केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी आरोपी हर्षलला तातडीने शोधून काढण्याचे आदेश देऊन विविध भागात वेगवेगळ्या पोलीस चमू रवाना केल्या होत्या. अखेर मृतदेहच मिळालानागपूर ग्रामीण पोलीस आरोपी हर्षलचा ठिकठिकाणी शोध घेत असतानाच नागपूर शहर पोलिसांनाही त्याच्याबाबत माहिती कळवली होती. प्रियावर हल्ला केल्यानंतर हर्षल गुरुवारी मोटरसायकलने कळमेश्वरमार्गे काटोलच्या दिशेने निघून गेला होता. दरम्यान, सोनखांब शिवारातील रेल्वे लाईनवर शुक्रवारी (दि. २२) दुपारी अनोळखी तरुणाचा मृतदेह कटलेल्या अवस्थेत आढळून आला. ‘त्या’ तरुणाने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज होता. त्याची वेळीच ओळख न पटल्याने रेल्वे पोलिसांनी नागपुरातील मोक्षधाम येथे दफनविधी आटोपला. ही माहिती कळताच खापरखेडा पोलिसांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर ‘तो’ मृतदेह हर्षलचाच असल्याचे स्पष्ट झाले. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये मंगळवारी दुपारी त्याचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी तहसीलदार, डॉक्टर व पंच मोक्षधाममध्ये हजर होते. त्याच्या हातावर ‘एच’ लिहिले होते, त्यावरूनच ती ओळख पटली. (प्रतिनिधी)तो मृतदेह कुणाचा ? हर्षलच्या मृतदेहाची होणार डीएनए टेस्टआज पोलिसांनी उकरून काढलेला मृतदेह हर्षलचाच असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. मात्र, प्रियाचे नातेवाईक ते मान्य करायला तयार नाहीत. हर्षल अत्यंत क्रूर होता. त्यामुळे त्याने आपले कपडे ‘त्या‘ मृतदेहावर चढवले असावे आणि पळून गेला असावा, अशी शंकावजा तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्याकडे केली. डॉ. सिंग यांनी त्याची दखल घेतली. हे प्रकरण आणखी चिघळू नये म्हणून हर्षलच्या मृतदेहाचे सॅम्पल घेऊन डीएनए टेस्ट करवून घेण्याची तयारी त्यांनी चालवली आहे. हर्षल आणि त्याच्या नातेवाईकांचे डीएनए टेस्ट केल्यानंतर जो मृतदेह सापडला तो हर्षलचाच आहे की नाही, हे स्पष्ट होईल. तसेच कुणाच्या मनात कोणती शंका राहाणार नाही. विनाकारण आरोप प्रत्यारोपही होऊ नये, यासाठी डीएनए टेस्टचा निर्णय ग्रामीण पोलिसांनी घेतल्याचे डॉ. आरती सिंग यांनी आज लोकमतशी बोलताना सांगितले.