शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

बोरघाटात मिळालेल्या मृतदेहाचा लागला छडा

By admin | Updated: April 28, 2016 02:43 IST

मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात १७ एप्रिल रोजी एका तरु णाचा कुजलेला मृतदेह आढळला होता.

खालापूर : मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात १७ एप्रिल रोजी एका तरु णाचा कुजलेला मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन करून त्याला खोपोलीत बेवारस दफनभूमीत पुरण्यात आले होते. तब्बल सव्वा महिन्यानंतर त्याची ओळख पटली असून, मंगळवारी मृतदेह बाहेर काढून तो त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. खून करून त्याचा मृतदेह या बोरघाटात टाकण्यात आला होता, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्याच्या मारेकऱ्यांना गुन्हे अन्वेषण शाखा, मुंबईने जेरबंद केल्याचीही माहिती मिळाली आहे.दीपक गुराप्पा पवार (३५) असे त्याचे नाव आहे. तो कुर्ला येथे राहणारा होता. त्याचे वडील गुराप्पा पवार यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार दीपकचा कुर्ला भागात सुरू असलेल्या काही अवैध धंद्यांना विरोध होता. तो कायम त्याबाबत तक्र ार करीत असे. त्यामुळे अवैध धंदा करणाऱ्यांबरोबर त्याचे भांडण झाले होते. त्यांनी दीपकला ठार मारण्याची, गायब करण्याची धमकी दिली होती. १४ एप्रिलला दीपक अचानक गायब झाला. कुर्ला पोलीस ठाण्यात तशी तक्र ार करण्यात आली, मात्र बेपत्ता असल्याची नोंद घेत महिनाभर संबंधित पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे पालकांनी क्र ाइम ब्रँचकडे तक्रार केली. गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला. संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आणि गुन्ह्याची उकल झाली. दीपकचा मृतदेह त्यांनी खून करून बोरघाटात टाकला होता, अशी कबुली मारेकऱ्यांनी दिली. खोपोली पोलिसांना १७ एप्रिलला एका तरु णाचा मृतदेह बोरघाटात एचओसी पुलाच्या बाजूच्या दरीत झुडपाला अडकलेला मिळाला होता. मृतदेह कुजलेला असल्याने शवविच्छेदन करून खोपोली बेवारस दफनभूमीत पुरण्यात आला होता. मंगळवारी दीपकचे आई -वडील, पत्नी मुंबई पोलिसांसमवेत खोपोलीत आले होते. त्यांच्याकडे मृतदेह देण्यात आला. (वार्ताहर)