शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

आंबोली दरीत पडलेल्या दुस-या युवकाचा सहाव्या दिवशी सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 22:48 IST

सावंतवाडी, दि. 5 - आंबोली कावळेसाद पॉर्इंट येथील दरीत पडलेल्या दोघा युवकांपैकी एका युवकाचा मृतदेह शुक्रवारी दरीतून बाहेर काढल्यानंतर ...

सावंतवाडी, दि. 5 - आंबोली कावळेसाद पॉर्इंट येथील दरीत पडलेल्या दोघा युवकांपैकी एका युवकाचा मृतदेह शुक्रवारी दरीतून बाहेर काढल्यानंतर दुसरा मृतदेह शनिवारी सहाव्या दिवशी सांगेली व लोणवळ्याच्या ट्रॅकर्सनी संयुक्तपणे मोहीम राबवून रोपवेच्या साहय्याने बाहेर काढला. हा मृतदेह गडहिंग्लज येथील इम्रान गारदी यांचा असून, तो सायंकाळी उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, पोलीस वगळता प्रशासनाच्या अन्य अधिकाºयांकडून अपेक्षित असे सहकार्य मिळाले नसल्याने शोधमोहिमेचे प्रमुख बाबल आल्मेडा यांनी नाराजी व्यक्त केली.

आंबोली-कावळेसाद येथील पॉर्इंटवर सोमवारी ३१ जुलैला मद्यधुंद अवस्थेत मौजमजा करताना बीड येथील प्रताप उजगरे व गडहिंग्लज येथील इम्रान गारदी हे दरीत पडले होते. या दोघांचे मृतदेह खोल दरीत दिसत होते. पण काढताना अडचणी येत होत्या. कोल्हापूर तसेच स्थानिक शोध पथके मृतदेह वर आणण्यासाठी प्रयत्नशील होती. पण त्यांना यश येत नव्हते. अखेर कोल्हापूर येथील शोधपथक गुरूवारी सायंकाळी निघून गेले. त्यानंतर सांगेली येथील बाबल आल्मेडा व आंबोलीतील किरण नार्वेकर यांनी शुक्रवारी पुन्हा शोधमोहीम राबवली व बीड येथील प्रताप उजगरे यांचा मृतदेह रोपवेच्या साहय्याने वर आणला होता.

शनिवारी सकाळीच पुन्हा सांगेली येथील बाबल आल्मेडा तसेच आंबोलीचे किरण नार्वेकर यांनी शोध मोहिमेस सुरूवात केली. त्यांना लोणावळा येथील ट्रॅकर्सनीही मदत केली. त्याच्या या शोधमोहिमेला दुपारी यश आले. इम्रान गारदी याचाही मृतदेह प्रतापचा मृतदेह आढळलेल्या ठिकाणाजवळच आढळून आला आहे. त्यानंतर खाली स्ट्रेचर सोडून रोपवेने हा मृतदेह वर काढण्यात आला. यासाठी स्थानिक शोधपथकाबरोबर लोणावळा येथील ट्रॅकर्स गणेश गिध व रोहित वर्तक हे दोघे खाली उतरले होते. 

पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी आंबोली कावळेसाद पॉईंट येथील खोल दरीत कोसळलेल्या दोन युवकांचे मृतदेह मिळाल्यानंतर शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिक्षातकुमार गेडाम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच पर्यटकांनी धबधब्यावर येतना सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे. दारू पिऊन धिंगाणा घालणा-यांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील तसेच जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे असे पोलीस अधीक्षक डॉ दीक्षांतकुमार गेडाम यांनी सांगितले.