शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

श्वेतपत्रिकेत विरोधकांवर बोट

By admin | Updated: April 3, 2015 02:40 IST

आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या कार्यकाळातील आर्थिक स्थितीवर नेमके बोट ठेवण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असून

संदीप प्रधान, मुंबई आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या कार्यकाळातील आर्थिक स्थितीवर नेमके बोट ठेवण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असून, राज्याच्या विकासासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यात येणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. नैसर्गिक संकटामुळे आर्थिक शिस्त बिघडत असल्याने पीक विमा योजना अधिक आकर्षक व सक्षम करताना उत्पन्नाचे नवनवीन स्रोत शोधून काढण्याबाबतही त्यात भाष्य करण्यात येणार आहे.मागील सरकारच्या काळात कर्जाचा बोजा ३ लाख कोटी रुपयांवर गेला आहे. त्यावर वर्षाकाठी २४ हजार कोटी रुपयांचे व्याज भरावे लागत आहे. राज्यात १९९५ ते ९९ या काळात युती सरकार असताना राज्यावरील कर्जाचा बोजा ४० हजार कोटी रुपयांच्या घरात गेल्याचा मुद्दा निवडणुकीत गाजला होता. सत्तेवर येताच तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने राज्याच्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका काढली होती. त्याच धर्तीवर आघाडीच्या गेल्या १५ वर्षांतील आर्थिक कारभाराची श्वेतपत्रिका  पुढील आठवड्यात अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मात्र या श्वेतपत्रिकेवर चर्चा केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या सध्या नागरी किंवा निमनागरी क्षेत्रात वास्तव्य करते. महापालिका क्षेत्रातील ज्या लोकांचे उत्पन्न चांगले आहे अशा लोकांकडूनही अनेकदा कर, दरवाढीला विरोध केला जातो. लोकांना चांगली सेवा, विकास हवा असेल तर खिशात हात घालण्याची तयारी ठेवावी लागेल, हे श्वेतपत्रिकेतून सूचित केले जाणार आहे. गतवर्षी राज्याची योजना ५१ हजार २२२ कोटी ५४ लाखांची होती. प्रत्यक्षात विकासाकरिता निधी उपलब्ध होऊ शकला नाही. या वर्षी ५४ हजार ९९९ कोटींची योजना सरकारने मांडली असली तरी प्रत्यक्षात उत्पन्नाची उद्दिष्टे साध्य करण्यात अनेकदा नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित अडचणी निर्माण होतात. राज्याच्या समतोल विकासासंबंधी डॉ. विजय केळकर समितीने सादर केलेल्या अहवालात राज्याच्या योजनेचे आकारमान वेगवेगळ्या करांच्या अथवा दरांच्या माध्यमातून ७५ ते ८० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची सूचना केलेली आहे. सरकारी योजनेचे आकारमान लागलीच एवढे वाढवणे अशक्य असले तरी उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करणे अपरिहार्य आहे.