शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त; हायकोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 07:25 IST

नवे मंडळ ८ आठवड्यांत स्थापन करा

औरंगाबाद : शिर्डी  साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे  न्या. आर.डी. धानुका व  न्या. एस.जी. मेहरे यांनी मंगळवारी दिले. खंडपीठाने विश्वस्तांच्या नियुक्तीसंदर्भातील १६ सप्टेंबर २०२१ ची अधिसूचना रद्द केली. या प्रकरणाची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली.

शासनाने आठ आठवड्यांत नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त करावे. तोपर्यंत अहमदनगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी आणि संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची तदर्थ समिती (ॲडहॉक) काम पाहील. तदर्थ समितीला मोठे आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नसतील, असे  उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. वरील निकाल काही दिवस स्थगित करावा, अशी विनंती विश्वस्तांच्या वकिलांनी केली होती, ती उच्च न्यायालयाने फेटाळली. हे प्रकरण अंतिम निकालासाठी २१ एप्रिल २०२२ रोजी राखून ठेवले होते.  

साईबाबा संस्थानचे विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी ॲड. सतीश तळेकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीस आव्हान दिले होते. अहमदनगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिकचे अतिरिक्त विभागीय आयुक्त आणि अहमदनगरचे सहधर्मादाय आयुक्तांची उच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन तदर्थ समिती ऑक्टोबर २०१९ पासून संस्थानचा कारभार पाहत आहे व उच्च न्यायालयाच्या परवानगीने धोरणात्मक, आर्थिक निर्णय घेत आहे. शासन नियुक्त नवीन व्यवस्थापन समितीने उच्च न्यायालयाची परवानगी न घेता तदर्थ समितीकडून कार्यभार घेतला, आदी आक्षेप घेणारी मूळ याचिका होती. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. प्रज्ञा तळेकर, अजिंक्य काळे यांनी, संस्थानच्या वतीने ॲड. ए.एस. बजाज व शासनाच्या वतीने ॲड. डी.आर. काळे यांनी काम पाहिले. 

नियुक्ती नियमानुसार नसल्याचा दावाशिर्डी संस्थानवरील शासन नियुक्त व्यवस्थापन समितीची नेमणूक श्री साईबाबा संस्थान विश्वस्त कायद्याच्या कलम पाच आणि २०१३ च्या विश्वस्त नेमणूक नियमानुसार झालेली नाही. यात आर्थिक व मागास प्रवर्गाचा प्रतिनिधी नाही, तसेच व्यापार व्यवस्थापन (बिझनेस मॅनेजमेंट) प्रवर्ग, आरोग्य आणि औषधी, ग्रामविकास या प्रवर्गांतील प्रतिनिधी नाहीत. मूळ नियमानुसार संस्थानचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह एकूण १७ जणांची समिती असणे अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत ११ सदस्य आणि शिर्डीचे नगराध्यक्ष पदसिद्ध सदस्य, अशा १२ सदस्यांचीच कार्यकारिणी कार्यरत होती, असा दावा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला होता.

टॅग्स :Saibaba Mandirसाईबाबा मंदिर