मंगळवेढा (जि. सोलापूर) : फेसबुकवरील कॉमेंटच्या वादावरून सचिन कलुबर्मे (२८) याचा बुधवारी कोयत्याने गळा चिरून खून करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा मित्र प्रदीप पडवळे हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी दोन नगरसेवकांसह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.पूर्वी फेसबुकवर टाकलेल्या संदेशावरून दोन गटांत वाद झाला होता. या वादावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल न करता पोलिसांनी हा वाद सामोपचाराने मिटवला होता. पण सचिन व प्रदीप सायंकाळी लग्नाची मिरवणूक पाहात असताना आरोपी बाबासाहेब नाईकवाडी, पांडुरंग नाईकवाडी (नगरसेवक), प्रशांत यादव (नगरसेवक), विशाल उन्हाळे यांनी कोयत्याने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.जत तालुक्यातील गुलगुंजाळ या खेड्यातून मुख्य आरोपी बाबासाहेब याला, तर अन्य ठिकाणाहून विशाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेतील दोन नगरसेवक अद्यापही हाती आलेले नाहीत. एका नगरसेवकाच्या वडिलांना व भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फेसबुकवरील कॉमेंटच्या वादावरून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:23 IST