शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

पोलिसांचा दबाव झुगारून सीमाभागात काळा दिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 06:49 IST

Black day : ...तरीही धरणे आंदोलन करत महाराष्ट्रात सामील होण्याचा वज्रनिर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषकांनी केला.

बेळगाव : पोलिसांचा दबाव झुगारत मराठी भाषकांनी सीमाभागात रविवारी काळा दिन पाळून कर्नाटक आणि केंद्र सरकारचा निषेध केला. बेळगावातील मराठा मंदिर या आंदोलनाच्या ठिकाणी जाता येऊ नये, यासाठी पोलिसांनी विविध भागांत नाकाबंदी, चौकशीसत्र आरंभले होते. तरीही धरणे आंदोलन करत महाराष्ट्रात सामील होण्याचा वज्रनिर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषकांनी केला.

या वेळी बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणाने उभे असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आंदोलन स्थळावर दिली. बेळगावसह सीमाभागातील काही गावे कर्नाटकात जोडल्याच्या निषेधार्थ प्रतिवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस ‘काळा दिन’ म्हणून पाळला जातो.

कोरोनामुळे प्रतिवर्षी होणारी सायकल फेरी आणि जाहीर सभा रद्द करण्यात आली. मराठा मंदिर येथे धरणे आंदोलन करण्यास प्रशासनाने सशर्त परवानगी दिली; पण ही परवानगी देताना आंदोलक स्थळापर्यंत पोहोचू नये यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन बंद पाडण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला, मात्र   पोलिसांनी त्यांना गोगटे पुलावर आणि चन्नमा सर्कल येथे रोखले.  सीमा भागातील येळ्ळूर, कंग्राळी खुर्द यांसह अनेक गावांत कर्नाटक शासनाचा निषेध करण्यात आला.

टॅग्स :belgaonबेळगाव