मुंबई : वांद्रे कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोअर्सच्या आवारात मंगळवारी ११८ फुट उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. व्यापारी संकुलात उभारण्यात आलेल्या ध्वजस्तभांची उंची ११८ फुट इतकी असून यावर ३० बाय २० चा ध्वज लावण्यात आला आहे. याप्रसंगी डायमंड बोअर्सचे अध्यक्ष अनुप मेहता, मुंबई डायमंड मर्चंटचे अध्यक्ष भारत शहा, किरीट भन्साळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बीकेसीत ११८ फुटांचा राष्ट्रध्वज
By admin | Updated: August 24, 2016 05:25 IST