शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींच्या महाराष्ट्राशी पंगा घेणाऱ्या भाजपचा तंबू उखडणार; शिवसेनेचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 12:51 IST

राज्यात सत्तास्थापन्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापनार अशी शक्यता आहे. तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी देखील केंद्रीयमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील मतभेद पराकोटीला गेले आहेत. 

मुंबई - राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर काढल्यानंतर शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेने सामना या मुखपत्रातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची घेतलेला पंगा भाजपला उखडून टाकणार,असा हल्लाबोल शिवसेनेने सामनातून केला आहे. ़

शिवसेनेला एनडीएमधून काढण्यात आले आहे. राज्यात शिवसेना-भाजपमध्ये असलेले मतभेद आणि राज्यात लागू झालेली राष्ट्रपती राजवट यामुळे वाद विकोपाला गेला आहे. शिवसेना सुरुवातीपासूनच एनडीएमध्ये होती. यावर टीका करताना शिवसेनेला एनडीएमधून काढणारे तुम्ही कोण असा सवाल सामनामधून भाजपला करण्यात आला.  ज्याने ही घोषणा केली, त्याला शिवसेनेचे मर्म आणि कर्म कळले नाहीत. ज्या काळात भारतीय जनता पक्षाच्या जवळही कोण फिरकत नव्हतं. त्यावेळी एनडीएची स्थापना झाली. त्याच एनडीएमधून शिवसेनेला काढण्याची नीच घोषणा केल्याचे म्हटले आहे. 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यातिथीच्या दिवशीच शिवसेनेला एनडीएमधून काढण्याची घोषणा करण्यात आली. सर्वजण विरोधात गेली असताना मोदींचा बचाव करणाऱ्या संघटनेला एनडीएतून बाहेर काढण्यात आलं आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा आहे. हा महाराष्ट्र मंबाजींना साथ देणार नाही. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राशी घेतलेला हा पंगा तुमचा बांबू उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे वचन आम्ही पंगा घेणाऱ्यांना देत आहोत, असंही आग्रलेखात म्हटलं आहे. 

राज्यात सत्तास्थापन्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापनार अशी शक्यता आहे. तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी देखील केंद्रीयमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील मतभेद पराकोटीला गेले आहेत.