शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

ठाण्यात अजित पवारांच्या मदतीने भाजपची शिवसेनेला रोखण्याची ‘क्रांती’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 09:01 IST

अजित पवार यांनी ठाण्यातील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली नाही. लागलीच ‘आभार दादा’ असे ट्वीट आव्हाड यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात क्रांती करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे महापालिकेतील ३६ जागांवर पवार हे दावा करतील. यातील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यात जर पवार यांना यश आले तर ठाण्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपला पवारांच्या मदतीने ठाण्यातील सत्तेचे दार उघडू शकते. ठाण्यात एकनाथ शिंदे यांना रोखण्याकरिता पवार हा भाजपच्या हातामधील हुकमी एक्का ठरणार आहे.

अजित पवार यांनी ठाण्यातील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली नाही. लागलीच ‘आभार दादा’ असे ट्वीट आव्हाड यांनी केले. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील बंड ही शरद व अजित पवार यांची मिलीभगत असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, राष्ट्रवादीचे स्थानिक नेते या टीकेचा इन्कार करतात. आव्हाड यांचे ठाण्यातील महत्त्व कमी करण्याकरिता पवार यांनी त्यांना अनुल्लेखाने मारले, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. ठाणे म्हणजे आव्हाड हे समीकरण पुसून टाकण्याच्या हेतूने पवार यांनी आव्हाडांवर टीका केली नाही. नजीब मुल्ला व आनंद परांजपे हे आव्हाडांचे पर्याय ठाण्यात उभे करण्याचा त्यांचा इरादा आहे.

मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार राष्ट्रवादी पक्षाचे नाव व चिन्ह हे अजित पवार यांना मिळाले तर राष्ट्रवादीच्या ३६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस या नात्याने अजित पवार हे दावा करणार आहेत. भाजपचे बहुतांश नगरसेवक हे आमदार संजय केळकर यांच्या विधानसभा मतदारसंघात आहेत. राष्ट्रवादीची कळव्यात लढत ही शिवसेनेसोबत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतरही महायुती म्हणूनच महापालिका निवडणुका लढविल्या गेल्या तर शिवसेनेला राष्ट्रवादीच्या जागांवर दावा करता येणार नाही. त्यामुळे पवार यांना हाताशी धरून ठाण्यात सत्तेचा सोपान चढण्याची क्रांती करण्याचा हा भाजपचा डाव असून, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे