शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम

By यदू जोशी | Updated: October 17, 2024 07:13 IST

देवेंद्र फडणवीसांकडून ‘समजूत अभियान’, दगाफटका नको म्हणून सावध भूमिका 

यदु जोशी -मुंबई : विधानसभेच्या तिकीट वाटपानंतर होणारी संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने डॅमेज कंट्रोल मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी तीन आघाड्यांवर काम केले जात आहे. बंडखोरीचा फटका पक्षाला आणि मित्रपक्षांनाही बसू नये याची काळजी घेतली जात आहे. रा.स्व. संघाच्या पदाधिकाऱ्यांचीही मदत घेतली जात आहे.  जिथे नाराजी होऊ शकते असे ५२ मतदारसंघ भाजपने काढले आहेत. तिथे नाराजीचा फटका बसू नये याची काळजी घेतली जात आहे. भाजपच्या वाट्याला येणार असलेल्या ज्या मतदारसंघांमध्ये दोन किंवा तीन प्रबळ दावेदार आहेत, त्यांच्यापैकी ज्याला तिकीट नाकारण्याचे ठरले आहे त्यांना त्या भागातील भाजपचे बडे नेते, संघाचे पदाधिकारी नीट समजावून सांगत आहेत. ज्यांचे तिकीट पक्के झाले त्यांना तसे सांगण्यात येत आहे. काही नेत्यांना समजावून सांगणे संघ, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कठीण जाते, अशांना मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलावून घेत आहेत. सागर बंगल्यावर चार दिवसांपासून फडणवीस यांनी ‘समजूत अभियान’ हाती घेतले आहे. 

जिथे गडबड होऊ शकते, त्या मतदारसंघांवर विशेष लक्ष दोनतीन प्रबळ दावेदारांपैकी एकाला तिकीट दिल्यानंतर इतर दोघांची समजूत काढणे, विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार आहे तिथे त्या आमदाराला शांत करणे यावर काम केले जात आहे. काही अगदी बोटावर मोजण्याइतके  असे मतदारसंघ आहेत की जे २०१९ च्या वा आधीच्या निवडणुकीत भाजपकडे होते, पण आता युतीधर्म पाळण्यासाठी ते शिंदेसेना वा अजित पवार गटाला द्यावे लागत आहेत.

अशा ठिकाणी भाजपमध्ये बंडखोरी होऊ शकते. ती होऊ नये आणि मित्रपक्षांना मदत व्हावी हा उद्देश समोर ठेवून ही पाऊले उचलली जात आहेत. सूत्रांनी सांगितले की, या निवडणुकीसाठी भाजपचे केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव यांनी या डॅमेज कंट्रोलसाठी अलीकडेच एक बैठक घेतली. ज्या मतदारसंघांमध्ये तिकीट वाटपानंतर किंवा महायुतीच्या फॉर्म्युला निश्चितीनंतर गडबड होऊ शकते, असे मतदारसंघ शोधण्यात आले आणि त्या मतदारसंघातील भाजप, संघाच्या अत्यंत निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. 

एकतर कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये बंडखोरी होणार नाही याची काळजी आधी घ्या, असे निर्देश देण्यात आले. समजा बंडखोरी झालीच तर त्याची झळ पक्षाला किती बसेल? बंडखोर उमेदवार किती मते घेऊ शकतो आणि बंडखोरामुळे जो फटका बसणार आहे तो कसा भरून काढता येऊ शकेल, या बाबत पक्षात चिंतन सुरू आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी