शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
5
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
6
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
7
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
8
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
9
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
10
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
11
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
12
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
13
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
14
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
15
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
16
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
17
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
18
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
19
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
20
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

भाजपाची पहिली चाल यशस्वी

By admin | Updated: September 19, 2016 01:30 IST

भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या पहिल्याच राजकीय खेळीत गेली सलग १० वर्षे पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात दिली

राजू इनामदार,

पुणे- केंद्र व राज्यातील सत्तेनंतर आता महापालिकेवर झेंडा रोवायचाच, या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या पहिल्याच राजकीय खेळीत गेली सलग १० वर्षे पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात दिली आहे. काँग्रेस, शिवसेना व मनसेही भाजपाच्या या आक्रमक पवित्र्याने गांगरून गेले आहेत. नवा डाव रचण्याऐवजी या पक्षांना भाजपाची आता पुढची चाल काय असेल, या चिंतेने ग्रासले आहे.राज्य सरकारने चार सदस्यांचा एक प्रभाग केल्यामुळे महापालिका निवडणुकीचे सूत्रच बदलले आहे. त्यात आपण बसायचे कसे, असा प्रश्न अनेक विद्यमान नगरसेवकांना पडला आहे. ८० ते ९० हजार मतदारांचा सामना करायचा तर वैयक्तिक संपर्काबरोबरच पक्षही प्रबळ पाहिजे, याची खूण पटली असल्यामुळे अनेकांना पक्षांतराचे वेध लागले आहेत. त्यात सर्वाधिक संख्या आहे ती मनसेच्या नगरसेवकांची हे सर्वश्रुत आहे, मात्र आमचा वाडा चिरेबंदी म्हणणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा प्रवेश भाजपाने घडवून आणल्यामुळे काँग्रेससह बाकीच्यांनाही आपल्या भिंती तपासून पाहाव्या लागत आहेत. मनसे व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा प्रवेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाल्यामुळे भाजपाची निवडणुकीची सूत्रे थेट मुंबईतूनच हलतील, अशी चिन्हे दिसत आहेत. सत्ता मिळविण्यासाठी सबळ उमदेवारांबरोबरच धर्म, जात, पैसे, नातेसंबंध असे अनेक घटक लागतात. या सगळ्यात आतापर्यंत बलवान होते ते काँग्रेस व राष्ट्रवादीच! भाजपा आता त्यामध्ये त्यांच्याबरोबरीनेच नव्हे तर तेवढ्याच समर्थपणे उभा राहत आहे, असे मुंबईतील प्रवेशाच्या घटनेवरून दिसते आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का बसला आहे तो त्याचा. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस अधिक घायाळ झाली आहे. >पक्षांतर घडवून संजय काकडेंनी दाखवली चुणूक कोपर्डी प्रकरणात निघत असलेल्या मराठा समाजाच्या क्रांती मोर्चामुळे या समाजाचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होते आहे. पुणे शहरात हा समाज एकवटला आहे तो पुण्याभोवतालच्या उपनगरांमधून. राष्ट्रवादीचे सध्याचे सर्वाधिक नगरसेवक तिथूनच निवडून आले आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीची यंदाच्या निवडणुकीत मदार आहे ती तिथूनच! भाजपाकडे नेमक्या याच चेहऱ्याची उणीव होती. ते ओळखूनच की काय, मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील त्या प्रवेश कार्यक्रमाची सगळी जबाबदारी खासदार संजय काकडे यांच्यावर दिली. किंबहुना हा प्रवेश कार्यक्रम त्यांनीच घडवून आणला असे बोलले जात आहे.संजय काकडे राज्यसभेचे खासदार आहेत. अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांना सेना भाजपाच्या सदस्यांनी मदत केली. राजकारणाचे वारे ओळखून त्यांनी भाजपाचे सहयोगी सदस्य होणे पसंत केले. गेल्या काही दिवसांत ते पुण्याच्या राजकारणात सक्रिय होऊ लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनीच त्यांना तसे सांगितले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दोन नगरसेवकांचे पक्षांतर घडवून आणून त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली. पक्षाचे बळ वाढविण्याबरोबरच त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीलाही धक्का दिला. आमच्याकडे येण्यासाठी बरेच जण तयार आहेत, असे भाजपाकडून वारंवार सांगण्यात येत असते. त्यात तथ्यांश असल्याचे या पक्षांतराने सिद्ध केले आहे. त्यामुळे आता कोण कोण येणार, त्याची चर्चा भाजपा करीत आहे, तर अन्य पक्षांच्या नेत्यांवर आपल्यातून कोण कोण जाणार, त्याचे अंदाज लढवत बसण्याची वेळ आली आहे.याही वेळी आमचीच सत्ता अशा आविर्भावात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला बचावात्मक पवित्र्यात जाणे भाग पडले आहे. त्यामुळेच त्यांनी घाईघाईत संबंधित नगरसेवकावर पक्षांतरबंदी कायद्याखाली कारवाई करू, असे जाहीर केले. त्यातूनच मग नगरसेवक दिनेश धाडवे यांनी आपण अजूनही राष्ट्रवादीतच आहोत, असे पत्र महापौर प्रशांत जगताप यांना दिले. मात्र निवडणूक लढविण्यास अपात्र होऊ नये, यासाठी केलेली ती केवळ तांत्रिक बाब झाली. भाजपाच्या या आक्रमकतेचा प्रतिकार कसा करायचा, याची खलबते आता राष्ट्रवादीच्या गोटात रंगू लागली आहेत.>राष्ट्रवादी व भाजपा यांच्यातच लढतपालिकेच्या सत्तेत राष्ट्रवादीबरोबर असलेल्या काँग्रेसची शहरातील अवस्था यथातथाच आहे. नवे अध्यक्ष रमेश बागवे त्यात चैतन्य आणण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. मात्र त्यांना पक्षाच्या नेत्यांची हवी तशी साथ मिळत नाही. तरीही काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंख्येने बराच असल्याने पक्षाचे अस्तित्व लक्षणीय आहे़ त्यामुळेच राष्ट्रवादीबरोबर आघाडी झाली तर जागेवरून त्यांच्यात वाद होणार हे आताच दिसते आहे.शहरातील सेनेचे बळ भाजपापेक्षा कधी काळी जास्त होते, मात्र तो आता इतिहासच झाला आहे. भाजपाने बरोबर घेतले नाही तर सेनेची अवस्था निवडणुकीत फार चांगली असेल, असे काही दिसत नाही. मनसेची घरघर सुरू झाली आहे. तब्बल २९ नगरसेवकांच्या या पक्षात सध्या कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी अवस्था आहे. थेट नाव घेऊन कोणता नगरसेवक कोणत्या पक्षात जाईल, याची जाहीर चर्चा होत असते, यावरून मनसेची वाटचाल येत्या निवडणुकीत कशी राहील, याचा अंदाज बांधता येतो. राष्ट्रवादी व भाजपा यांचाच जोरदार सामना होण्याची दाट शक्यता असून त्याच्या पहिल्या टप्प्यात सध्या तरी भाजपाने बाजी मारली असल्याचे दिसत आहे.