शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात भाजपाला पराभवाचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 13:34 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे.

नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत उमेदवार ज्योती राऊत यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुरस्कृत धनश्री ढोमने यांनी त्यांचा पराभव केलाय. ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत एकूण नऊ जागांपैकी भाजपा पुरस्कृत 5 सदस्य तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत 4 सदस्य निवडूण आले आहेत. 

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दत्तक घेतलेल्या सुरादेवीतही भाजपाला धक्का बसला आहे. तिथे काँग्रेस पुरस्कृत सुनील गंगाराम दुधपचारे विजयी झाले आहेत. बावनकुळेंचे मुळ गाव असलेल्या खसाळा ग्रामपंचायतीत भाजपाला यश मिळाले आहे. तिथे सरपंचपदी भाजप समर्थित रवी पारधी विजयी झाले आहेत.

सिंधुदुर्गात राणेंच्या समर्थ विकास पॅनलचे वर्चस्वसिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थ विकास पॅनलने कमाल करुन दाखवली आहे. कोकणात राणेंनी वेगळी चूल मांडली आणि ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली. पहिल्याच प्रयत्नात राणेंनी बाजी मारलेली दिसत आहे. या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागला आहे. राणेंनी ग्रामपंचायत निवडणूक चांगली कामगिरी केल्याने राणेंचे वर्चस्व पुन्हा एकदा येथे दिसून येत आहे.तारकर्ली - समर्थ विकास आघाडीकंदळगाव - समर्थ विकास आघाडीशिरवल - समर्थ विकासतळगाव - शिवसेनादेवगडमध्ये- 5 ग्रामपंचायती समर्थ विकासमालवण - 5 सेना 11 समर्थसावंतवाडी - 5 भाजप, 3 शिवसेना तर 10 समर्थ विकास आघाडी

काल 18 जिल्ह्यातील जवळपास 4 हजार 119  ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदासाठी मतदान झाले. यातील साधारण 180  ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस