मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या यात्रेसाठी वापरण्यात येणारा रथ सज्ज झाला आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान फडणवीस २५ दिवस रथातच घालवतील. भाजपा अध्यक्ष अमित शहांनी पश्चिम बंगालमधील यात्रेदरम्यान याच रथाचा वापर केला होता. महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा १ ते ९ ऑगस्ट दरम्यान पार पडेल. अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून यात्रेला सुरुवात होईल. या यात्रेसाठी वापरला जाणारा लवकरच मोझरीत दाखल होईल. या रथाला मुंबईत अंतिम स्वरुप देण्यात आलं असून असा आणखी एक रथदेखील तयार ठेवण्यात आला आहे. पर्याय म्हणून हा रथ वापरला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा १६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान पार पडेल. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेदरम्यान २५ दिवस रथातच असतील.
भाजपाचा 'तो' रथ महाराष्ट्रात; मुख्यमंत्र्यांना लाभदायक ठरणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 15:05 IST