श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : सरकारने कर्जमाफी करताना शेतकºयांना रांगेत उभे केले़ भाजपा सरकार शेतक-यांशी बनवाबनवी करीत आहे़ बाहेर वाघाची डरकाळी फोडणारी शिवसेना विधानभवनात मांजर होते, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.शेतकºयांना कर्जमाफी देतानाही अटी, शर्ती टाकल्या आहेत. २६ सप्टेंबरपासून सरकारच्या विरोधात एल्गार पुकारणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. श्रीगोंदा येथे रविवारी झालेल्या एल्गार शेतकरी मेळाव्यात कडू म्हणाले, सध्या कोणत्याच पक्षाला ना ध्येय, ना धोरण आहे़ मंत्रालय हा मंत्री, बिल्डर, अधिकारी यांचा अड्डा बनला आहे़ रासपचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा म्हणाले, सर्वच नेत्यांना मदत केली़ पण त्यांनी फसविण्याचे काम केले़
कर्जमाफी ही भाजपाची ‘बनवाबनवी’, आमदार बच्चू कडू यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 03:36 IST