शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊ खोत यांना संधी देताना भाजपाकडून विश्वासघात, राजू शेट्टींचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 19:54 IST

‘मी शेतक-यांचा नेता असल्यामुळे ते ठरवतील, त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची माझी तयारी आहे. यासाठी मला कोणाच्या प्रमाणपत्राची आणि शिफारशीची गरज नाही’, असा प्रतिटोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला.

सांगली, दि. 19 - ‘मी शेतक-यांचा नेता असल्यामुळे ते ठरवतील, त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची माझी तयारी आहे. यासाठी मला कोणाच्या प्रमाणपत्राची आणि शिफारशीची गरज नाही’, असा प्रतिटोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना शनिवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. सदाभाऊंना विधानपरिषदेवर संधी देताना भाजपने विश्वासघात करून त्यांच्या कोट्यातून अर्ज भरून घेतला, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

कृषी राज्यमंत्री खोत यांनी शुक्रवारी खा. शेट्टींवर जोरदार टीका केली होती. त्या आरोपांचा शेट्टी यांनी येथे समाचार घेतला. खा. शेट्टी म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपबरोबर आघाडी करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधानपरिषदेची एक जागा आणि एक मंत्रीपद देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार विधानपरिषदेसाठी आम्ही संघटनेकडून सदाभाऊ खोत यांच्या नावाची शिफारस केली. मात्र विधानपरिषदेचा अर्ज भरताना भाजपच्या नेत्यांनी विश्वासघात करून भाजपाच्या चिन्हावर त्यांचा अर्ज भरून घेतला. त्यामुळेच सदाभाऊ सध्या डरकाळी फोडत आहेत. मात्र संघटना सोबत नसती तर सदाभाऊ, तुम्हाला भाजपने विधानपरिषद आणि मंत्रिपदावर तरी ठेवले असते का? याचे राज्यातील लाखो शेतकरी साक्षीदार आहेत.  

मंत्रिपदासाठी शेतकºयांचा तरी विश्वासघात करू नका. तुमच्याकडे थोडा जरी सन्मान असेल तर, संघटनेच्या जोरावर मिळविलेल्या मंत्रिपदावरून दूर व्हा. पुन्हा खुशाल मंत्री झाल्यास आमचा त्याला काहीच आक्षेप नसेल. ते म्हणाले की, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर जाऊन निवडणूक लढवावी, असे खोत यांचे मत आहे. प्रत्यक्षात मी कोठून निवडणूक लढवावी, यासाठी खोत यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी शेतकºयांचा नेता असून, ते सांगतील त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मी तयार आहे. माझ्या निवडणुकांचा सर्व खर्च शेतकरीच करत असल्यामुळे मला कधीच भीती वाटत नाही. शेतकरी सांगतील त्या राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून मी निवडणूक लढवेन, पण तुमची काय अवस्था होणार आहे, ते आगामी निवडणुकीत शेतकरीच तुम्हाला दाखवून देतील.

संघटनेतील कारभाराबद्दल कार्यकर्तेच उत्तर देतीलस्वाभिमानी शेतकरी संघटनेत हुकूमशाही पध्दतीने कारभार असता तर, सदाभाऊ तुम्ही मंत्री म्हणून राज्यभर मिरवले असता का, हे तुमच्या मनाला तुम्हीच विचारा. संघटनेत कशापध्दतीने कारभार चालतो, याविषयी मी सांगण्यापेक्षा कार्यकर्त्यांनीच त्यावर उत्तर देणे योग्य ठरेल. मीच संघटनेच्या कारभाराबद्दल सांगून माझी स्तुती केल्याप्रमाणे होईल, असा खुलासाही खा. शेट्टी यांनी केला.

माझ्या भानगडींची सीआयडी चौकशी करामाझा जन्मच शेतकरी कुटुंबात झाला आणि लहानाचा मोठाही शेतकरी चळवळीतच झालो. मी जर भानगडी, साखर सम्राटांबरोबर दलाली आणि संघटनेचा राजकीय ‘व्यवसाय’ केला असता, तर जिल्हा परिषद ते खासदार पदापर्यंत शेतक-यांनी मला कधीच संधी दिली नसती. शेतकºयांशी गद्दारी करणे आमच्या रक्तातच नाही. तरीही तुम्ही म्हणत असाल तर, भानगडींची सीआयडी चौकशी करून मला तुरुंगात टाका, असे आव्हान खा. शेट्टी यांनी सदाभाऊंना दिले.

सदाभाऊ, तुम्ही साधू संत... हरिभक्त!सदाभाऊ खोत किती स्वच्छ कारभार करतात, याचा अनुभव राज्यातील जनतेने घेतला आहे. शासकीय यंत्रणेलाही त्यांच्या पारदर्शी कारभाराची चांगलीच कल्पना आहे. त्यांचा कारभार साधू संत, हरिभक्ताप्रमाणे कसा चालू आहे, याचा प्रत्यय सर्वांनाच आला आहे. सदाभाऊंना माझ्या कारभाराबद्दल बोलण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही, अशी टीकाही खा. शेट्टी यांनी केली.