शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भाजप यंग ब्रिगेडला मंत्रिपदाची आस; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 10:04 IST

विदर्भातील आकाश फुंडकर, परिणय फुके, बंटी भांगडिया, समीर मेघे, मोहन मते यांची नावेही चर्चेत आहेत

मुंबई : भारतीय जनता पक्षातील दिग्गजांना कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असताना यंग ब्रिगेडला राज्यमंत्रिपदाची आस लागली आहे. भाजपचे दोन आमदार हे केंद्रीय मंत्र्यांचे पुत्र आहेत. नारायण राणे यांचे पुत्र नीतेश आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे दोघेही विधानसभेचे सदस्य आहेत. एका घरात एकच पद हा निकष भाजपच्या श्रेष्ठींनी लावला तर नीतेश आणि संतोष या दोघांनाही मंत्रिपदापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटाकडे कोकणातील उदय सामंत आणि दीपक केसरकर हे दोन मोठे नेते आहेत. अशावेळी कोकणात भाजपचाही दबदबा असावा, यासाठी नीतेश राणे यांच्याबाबत अपवाद केला जाईल का, याबाबत उत्सुकता आहे.

विदर्भातील आकाश फुंडकर, परिणय फुके, बंटी भांगडिया, समीर मेघे, मोहन मते यांची नावेही चर्चेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सचिन कल्याणशेट्टी व राम सातपुते हे दोघेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. याशिवाय मुंबईतील अमित साटम, नाशिकचे राहुल आहेर, पुण्याचे सुनील कांबळे, अमरावती जिल्ह्यातील प्रताप अडसड, अकोल्याचे रणधीर सावरकर यांची नावेही चर्चेत आहेत. महिला आमदारांमध्ये माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, सीमा हिरे, मनीषा चौधरी यांची नावे मंत्रिपदासाठी विचाराधीन असल्याचे समजते. 

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस