शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात केवळ एवढ्या जागा जिंकू शकेल भाजपा? अंतर्गत सर्व्हेनं पक्षाचं टेन्शन वाढवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 14:40 IST

लोकसभा निवडणुकीचा विचार करता, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपाच्या मोठ्या प्रमाणावर जागा कमी झाल्या. यामुळे, यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीचा विचार करता, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपाच्या मोठ्या प्रमाणावर जागा कमी झाल्या. यामुळे, यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कुठलेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपा आपल्या कामगिरीसंदर्बात चिंतित दिसत आहे. भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये 288 विधानसभा जागांपैकी पक्षाला केवळ 55 ते 65 जागाच मिळू शकतात, असे दिसत आहे. यापूर्वी भाजपाला 2014 मध्ये 122 तर 2019 मध्ये 105 जागा मिळाल्या होत्या.

संघही नाराजसंबंधित वृत्तानुसार, भाजपा आणि अजित पवार यांच्या युतीमुळे संघ नाराज आहे. यापूर्वी, 'ऑर्गनायझर'मध्ये लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या खराब कामगिरीचे कारण अजित पवार असल्याचे म्हणण्यात आले होते. याशिवाय, सघ आणि भाजपाचे काही कार्यकर्तेही या युतीमुळे नाराज असल्याचे दिसत आहे.

उद्धव ठाकरेंचं भाजपाला आव्हान -बुधवारी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देताना उद्धव ठाकरे म्हणाले, "कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक माझ्या घरावर चालून येत आहेत. अनिल देशमुख म्हणाले की, मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता. पण हे सगळे सहन करून मी हिमतीने उभा राहिलेलो आहे. मी तडफेने उतरलो आहे. तेव्हा एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन."

टॅग्स :BJPभाजपाvidhan sabhaविधानसभाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसElectionनिवडणूक 2024