शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दोन मित्रपक्षांना ११० जागा, १७८ जागा भाजप लढणार?; शिवसेना, राष्ट्रवादीची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 07:32 IST

१५२ जागा जिंकण्याच्या बावनकुळेंच्या विधानाने भुवया उंचावल्या

भिवंडी : भाजप २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत १५२ जागा जिंकेल आणि आम्ही लढविलेल्या जागांपैकी ८५ टक्के जागा जिंकू असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गात केले. त्यामुळे भाजप १७८ जागा लढणार व शिवसेना व राष्ट्रवादी यांना मिळून ११० जागा सोडणार असल्याचा स्पष्ट तर्क त्यातून निघाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ज्या रिसॉर्टमध्ये शिबिर झाले, तेथे ठिकठिकाणी भाजपच्या ‘१५२ प्लस’ या मिशनचे फलक लावले होते. बावनकुळे पत्रपरिषदेत म्हणाले की, राज्यात आमची महायुती लोकसभेच्या ४५ जागा जिंकेल. आमची तीन पक्षांची युती विधानसभेच्या २०० हून अधिक जागा जिंकेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, बावनकुळे जेवढ्या जागा जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत आहेत ते साध्य होण्यासाठी आवश्यक त्या जागा त्यांना लढायला मिळतील असे म्हणत बावनकुळे यांच्या विधानाला बळ दिले.

लोकशाही आहे; बोलण्याचे स्वातंत्र्यही आहे. प्रत्येकजण आपापले आकडे सांगत असतो. बावनकुळे बोलले असतील पण निर्णय तीन पक्षांचे वरिष्ठ नेतेच घेतील. आता तीन पक्षांची समन्वय समितीही नेमली आहे. समन्वय नक्कीच वाढेल.- उदय सामंत, मंत्री (शिवसेना)

बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष आहेत पण जागावाटपात त्यांना किती अधिकार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आमचे वरिष्ठ नेते भाजपच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करतील व ठरवतील. या विषयी अधिक भाष्य करणे योग्य नाही. - सूरज चव्हाण, प्रवक्ते, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना