शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गुणरत्न सदावर्तेंना भाजपाचं पाठबळ, राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्यांकडून हल्ल्याचं समर्थन: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 12:03 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्वर ओक' या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून झालेल्या हल्ल्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज थेट भाजपावर निशाणा साधला आहे.

मुंबई-

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्वर ओक' या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून झालेल्या हल्ल्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज थेट भाजपावर निशाणा साधला आहे. "पवारांच्या घरावर झालेलं आंदोलन नव्हतं. तो हल्ला होता आणि त्यात एसटीचे कर्मचारी नव्हते. यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे याची कल्पना सर्वांनाच आहे. याची पाळंमुळं गृहमंत्र्यांनी शोधून काढावीत. भाजपानं नवनिर्माण केलेला गुणरत्न सदावर्ते याला भाजपाचं पाठबळ आहे. तो कुठे राहतो. कुणाच्या घरात राहतो. आर्थिक रसद कोण पुरवतं याची कल्पना सर्वांना आहे. कालचा हल्ला हा त्याचाच एक भाग होता", असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

संजय राऊत यांनी आज 'सिल्वर ओक'वर शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. संजय राऊत यांनी यावेळी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांनाही लक्ष्य केलं. "ज्या प्रकारच्या भाजपाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या हे बोलणारे कोण होते? जे कालपर्यंत राष्ट्रवादीत होते ते आज भाजपात गेले. ते पवारांविरोधात बोलत होते. कालच्या हल्ल्याचं समर्थन करत होते. हा हलकटपणा आहे. ज्या पक्षानं तुम्हाला मोठं केलं. पवारांनी मोठं केलं. तुम्ही काय मुळचे भाजपावाले आहात का? हे पाप तुम्ही कुठं फेडणार आहात?", असं संजय राऊत म्हणाले. 

सदावर्तेंना भाजपाकडून आर्थिक पाठबळ"आता सुद्धा हा जो कोणी भाजपाचा एक नवनिर्माण केलेला नेता आहे. सदावर्ते. त्याला संपूर्ण पाठिंबा भाजपाचा आहे. तो कुठे राहतो? कुणाच्या घरात राहतो? त्याला आर्थिक पाठबळ कोण पुरवतं? त्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात गरळ ओकण्यासाठीच ठेवलेलं आहे. कालचा हल्ला त्याचाच एक भाग होता. हे आम्ही जो तपास करत आहोत त्यातून सिद्ध झालं आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार