शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
2
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
3
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
4
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
5
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
6
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
7
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा!
8
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
9
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
10
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
11
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
12
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
13
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
14
'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले
15
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
16
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
17
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
18
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
19
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 
20
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला

“देवाभाऊ CM आहेत, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, योग्यवेळी २१०० रुपये देणार”: शिवेंद्रराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 19:29 IST

Ladki Bahin Yojana: आपल्याला दिलेला शब्द पूर्ण करतील. देवेंद्र भाऊ योग्य वेळी २१०० रुपयांबाबत निर्णय घेतील, असे शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे.

Ladki Bahin Yojana: २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरलेली आहे. विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. परंतु, याची पूर्तता कधी होईल, याची निश्चित शाश्वती नसल्याचे म्हटले जात आहे. यातच राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केले आहे.

काहीच दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत राज्य सरकारचे कौतुक केले होते. लाडकी बहीण योजना राज्य सरकारने तयार केली आहे आणि राज्य सरकार ती चालवत आहे. या योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो. लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून यशस्वीपणे राबवली जात आहे, असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले होते. आता शिवेंद्रराजे यांनी याबाबत एका सभेत बोलताना गॅरंटी दिली आहे.

देवाभाऊ CM आहेत, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

अनेक योजना शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्याला दिलेल्या आहेत. या योजनांचा चांगल्या पद्धतीने लाभ करून घ्यायला हवा. लाडकी बहीण योजना सुरू आहेच. या योजनेबाबत विरोधक गैरसमज पसरवत आहेत. परंतु, माझी सर्व बहि‍णींना विनंती आहे की, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आपण काळजी करू नका. वाढीव हप्ता देण्याचा निर्णय योग्यवेळेला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेतला जाईल. जे काही २१०० रुपये जाहीर केले होते, ते योग्यवेळेला आपल्याला देवेंद्रभाऊ देणार. कारण आपला भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे देवेंद्र भाऊ नक्कीच योग्यवेळाला हा निर्णय करतील. आपल्याला दिलेला शब्द पूर्ण करतील, अशी ग्वाही शिवेंद्रराजे यांनी दिली. 

दरम्यान, राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्यासाठी अनेक योजना बनवत आहेत. परंतु, खऱ्या अर्थाने या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. लोकांना या योजनांची माहिती मिळत नाही. या योजना आपल्याला हव्या असतील तर काय करावे लागते, याची योग्य आणि पुरेशी माहिती लोकांकडे नसते. थोडा वेळ काढून सरकारी कार्यालयात जाऊन याची माहिती घ्यावी, असे आवाहन शिवेंद्रराजे यांनी केले. काही जण योजनांचा पूरेपूर लाभ घेतात, तर काही जण गैरफायदाही घेतात, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.

 

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा