शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या प्रस्तावासाठी दारं २४ तास खुली; भाजपाने माघारीची शक्यता 'शत-प्रतिशत' फेटाळली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 17:14 IST

महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेने घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा आता सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मुंबई - महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेने घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा आता सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीचंच सरकार स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

 राज्यात निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्र्यांचे निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, याचा पुनरुच्चार केला. ''देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत आणि संपूर्ण भाजपा मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे आहेत. तसेच राज्यामध्ये येत्या काही काळात भाजपा-शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन होईल,'' असे चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी महायुतीच्या चर्चेसंदर्भातील चेंडूही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या कोर्टात टोलावला. ''राज्यात महायुतीला जनादेश मिळाला आहे. त्या जनादेशाच आदर करून आम्ही सरकार स्थापन करू. शिवसेनेकडून सत्तास्थापनेबाबत कुठलाही प्रस्ताव आम्हाला मिळालेला नाही. आता ते लवकरात लवकर प्रस्ताव देतील अशी अपेक्षा आहे. शिवसेनेसाठी भाजपाची दारे २४ तास खुली आहेत. आम्ही शिवसेनेची वाट पाहू,''असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  

 

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019