शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा-शिंदे गटाचा बोलबाला; पहिल्याच सामन्यात शतकी भागीदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 17:34 IST

शिवसेनेतील बंडामुळे पक्षात उभी फूट पडल्याचं चित्र होते. त्यात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदात आमनेसामने आला.

मुंबई - राज्यात झालेल्या सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर राज्यात पहिल्यांदाच २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीचा निकाल आज लागला आहे. या २७१ पैकी तब्बल १०० हून अधिक ग्रामपंचायतींवर भाजपा आणि शिंदे गटाचा बोलबाला झाल्याचं दिसून येत आहे. २७१ पैकी भाजपानं ८२ तर शिंदे गटाने ४० हून अधिक ग्रामपंचायतींवर झेंडा रोवला आहे. तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला सर्वाधिक फायदा झाला आहे. राज्यात ५३ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचं पॅनेल जिंकून आले आहे. 

शिवसेनेतील बंडामुळे पक्षात उभी फूट पडल्याचं चित्र होते. त्यात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदात आमनेसामने आला. आज लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजपा ८२, राष्ट्रवादी ५३, शिंदे गट ४०, शिवसेना २७, काँग्रेस २२ तर इतरांना ४७ जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे गटाने मराठवाड्यात अभूतपूर्व यश मिळवलं आहे. धुळे जिल्ह्यात एकूण ५२ ग्रामपंचायतीत शिवसेनेला ३ प्लस, शिंदे गटाला २० प्लस, भाजपा १५ प्लस, काँग्रेस १० प्लस ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवता आला आहे. 

औरंगाबादेत शिंदे गटाचे वर्चस्व पाहायला मिळालं. याठिकाणी शिंदे गटात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकालांकडे सगळ्यांचे लक्ष होते. शिंदे गटाने वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीत १२ जागा जिंकत शिवसेनेला धक्का दिला आहे. सिल्लोडमध्ये तिन्ही ग्रामपंचायतीवर शिंदे समर्थक गटाचा विजय झाला आहे. पैठण तालुक्यातील ७ पैकी ६ ग्रामपंचायती शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अनरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायती शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत.

उद्धव ठाकरे गटाला मिळालं यशशिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला बोलबाला पाहायला मिळाला आहे. चिंचपूरच्या या निकालामुळे भाजपाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांना मोठा धक्का मानला जात आहे. सोलापूरात देशमुख यांचे वर्चस्व आहे. मात्र चिचंपूरमधील ग्रामपंचायतीच्या निकालाने उद्धव ठाकरे गटाने बाजी मारत भाजपाला चितपट केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीचे निकाल लागणार आहेत. यात पहिला निकाल चिंचपूर ग्रामपंचायतीचा लागला असून शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे ७ पैकी ७ सदस्य निवडून आल्यानं कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाgram panchayatग्राम पंचायत