मुंबई : मुंबईतील मैदान खासगी क्लब आणि संस्थांना बहाल करण्याच्या बदल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे सहकार्य मिळविल्याचा आरोप नारायण राणे यांनी शुक्रवारी केला. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मातोश्रीवर जाऊन आले. सत्तेबाहेर पडण्याच्या धमक्या देणा-या शिवसेनेचा आवाज या भेटीनंतर बंद झाला. सेना नेत्यांकडे असलेली उद्याने-मैदाने कायम ठेवण्याच्या बदल्यात ही तडजोड झाली का, असा सवाल राणे यांनी केला.
मैदानासाठी भाजपाचा सेनेशी सौदा - राणे
By admin | Updated: July 30, 2016 03:12 IST