शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यकर्ते नवनीत राणांना पाठवणार ‘जय श्रीराम’ लिहिलेले 5 हजार पोस्टकार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 16:11 IST

अमरावतीचे भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अतुल गोळे आणि विनय गावंडे यांनी ‘जय श्रीराम’ लिहिलेली पाच हजार पोस्टकार्ड पाठवण्याचा अभियान सुरु केले आहे.

अमरावती - जय श्रीरामाच्या घोषणा देण्यासाठी संसद ही योग्य जागा नाही. त्याचासाठी मंदिरं आहेत. अशी भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे . अमरावती जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते   ‘जय श्रीराम’ लिहिलेली पोस्टकार्ड राणा यांना पाठवणार आहेत. त्यामुळे ‘जय श्रीराम’ या वाक्यावरुन देशात राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे.

संसदेत भाजप खासदारांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने, यावर खासदार नवनीत राणा यांनी आक्षेप घेतला होता. जय श्रीरामाच्या घोषणा संसदेत देऊ नका, त्यासाठी मंदिर आहेत. सगळे देव एकच आहेत यावर माझा विश्वास आहे. मात्र जय श्रीराम अशा घोषणा संसदेत देणं योग्य नसल्याची भूमिका राणा यांनी घेतली होती.  त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांना ‘जय श्रीराम’ लिहिलेली पाच हजार पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्धार केला असून, यातील शेकडो पोस्टकार्ड आतापर्यंत पाठवण्यात आली आहे. संपूर्ण अमरावती जिल्ह्यात ही मोहीम राबविली जात आहे.

अमरावतीचे भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अतुल गोळे आणि विनय गावंडे यांनी ‘जय श्रीराम’ लिहिलेली पाच हजार पोस्टकार्ड पाठवण्याचा अभियान सुरु केले आहे. तर, भारतातील बहुसंख्य नागरिकांचे श्रद्धास्थान श्रीराम आहेत, त्यांच्या उच्चाराने खासदार नवनीत राणा यांना कसला त्रास झाला? हे नवनीत राणांनी स्पष्ट करावं, असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी केला.

काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. यावरून त्या चांगल्याच भडकल्याचं व्हिडिओ वायरल झाल होता. त्यानंतर, भाजपने ममतांना ‘जय श्रीराम’ लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला होता.