शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाच कोटींची भाजपाची आॅफर! शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट : भाजपाने मात्र फेटाळला आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 03:15 IST

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपामध्ये येण्यासाठी मला व शिवसेनेच्या इतर आमदारांना ५ कोटी रुपयांची आॅफर दिली होती, असा गौप्यस्फोट कन्नड-सोयगावचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव

राम शिनगारे औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपामध्ये येण्यासाठी मला व शिवसेनेच्या इतर आमदारांना ५ कोटी रुपयांची आॅफर दिली होती, असा गौप्यस्फोट कन्नड-सोयगावचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी ‘लोकमत’कडे केला. हा आरोप भाजपाने फेटाळून लावला आहे.हर्षवर्धन जाधव यांनी मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीसंदर्भात बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची १७ आॅक्टोबर रोजी मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली व मतदारसंघातील प्रलंबित रस्त्यांची यादीच सादर केली. यातील बहुतांश कामांना मंजुरी मिळालेली आहे. मात्र, निविदा काढण्यात येत नाहीत. दिरंगाईमुळे जनतेत रोष आहे. आमचे फिरणे मुश्कील झाले असल्याचे सांगितले. यावर चंद्रकांतदादा निर्णय घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, उलटेच घडल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यांनी प्रश्न मार्गी लावण्याऐवजी भाजपातच का येत नाहीत, अशी विचारणा करत, पक्षात आल्यावर सर्व कामे मार्गी लागतील, आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला, तर निवडणुकीत खर्च करण्यासाठी ५ कोटी रुपयेसुद्धा मिळतील, अशी आॅफर दिली. मात्र, ती धुडकावून लावत, रस्त्यांची कामे मार्गी लावा. प्रेमाने सर्व काही मिळते. मात्र, आपण विकत घेण्याचा प्रयत्न केला, तर काहीच मिळणार नाही, असे सांगितल्याचा दावाही जाधव यांनी केला.पक्षप्रमुखांच्या दौºयानंतर निवडला मुहूर्तआ. जाधव यांना भाजपामध्ये येण्याची आॅफर १७ आॅक्टोबर रोजी देण्यात आली असेल, तर या घटनेला महिना होत आला आहे. तरी याची कोठेही वाच्यता जाधव यांनी केली नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आ. जाधव यांच्या वडिलांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात कन्नड येथे रविवारी हजेरी लावली. यानंतर, तिसºयाच दिवशी जाधव यांनी हा गौप्यस्फोट केला. पक्षप्रमुखांची मर्जी संपादन केल्यानंतर, थेट राज्य सरकारमधील शक्तिशाली मंत्र्यांवरच आरोप केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आरोपांमागे कोणते राजकारण आहे, याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत.बिनबुडाचे आरोप -हर्षवर्धन जाधवयांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. आपले अपयश झाकण्यासाठी ते असले उद्योग करीत आहेत. असले उद्योग करण्याची भाजपाला गरज नाही. भाजपाकडे चांगल्या कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. - माधव भंडारी, मुख्य प्रवक्ते, प्रदेश भाजपा

टॅग्स :Harshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवBJPभाजपाShiv Senaशिवसेना