शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

निष्क्रिय सवरांविरुद्ध भाजपातूनच रसद!

By admin | Updated: September 17, 2016 03:41 IST

आदिवासी विकासमंत्री म्हणून कोणताही प्रभाव पाडण्यात यश न आलेले भाजपाचे विष्णू सवरा यांना मंत्रिपदावरून हटविण्यामागे पक्षातीलच काही आदिवासी आमदार असल्याचे बोलले जात आहे.

यदु जोशी ल्ल मुंबईआदिवासी विकासमंत्री म्हणून कोणताही प्रभाव पाडण्यात यश न आलेले भाजपाचे विष्णू सवरा यांना मंत्रिपदावरून हटविण्यामागे पक्षातीलच काही आदिवासी आमदार असल्याचे बोलले जात आहे. विशेषत: सवरांच्या जागी आपल्याला मंत्रिपद मिळेल, ही आशा असलेले काही नेते सवरांच्या विरोधाला रसद पुरवत असल्याचीही चर्चा आहे.दीर्घकाळ आमदार असलेले सवरा स्वत: आदिवासी आहेत आणि पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्याचे नेतृत्व करतात. ते तेथील पालकमंत्रीदेखील आहेत. या जिल्ह्यात कुपोषणाने बालके दगावत असताना सवरा तिकडे फिरकले नाहीत. त्यातच, ‘आदिवासी मेले तर मरू देत’, असे त्यांनी न म्हटलेले वाक्य त्यांच्या तोंडी टाकून राष्ट्रवादी काँग्रेसने टीकेची झोड उठविली आहे. अनेक वर्षे राष्ट्रवादीमध्येच असलेले आणि आताही त्या पक्षात चांगले संबंध असलेले आणि आता भाजपाचे आमदार असलेले एक नेते आपल्या जुन्या पक्षाच्या खांद्यावर बंदूक ठेवत असल्याचे चित्रही समोर आले आहे.सवरा यांना मंत्रिपदावरून हटविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी समाजातील काही लोकांकडून पत्र पाठविणे, भाजपाच्या आदिवासी आमदारांचा एक दबावगट तयार करणे, त्यांच्या गुप्त बैठकी घेणे अशा जोरदार हालचाली काही महिन्यांपासून सुरू आहेत. गेल्या विस्ताराअगोदर ‘सवरांना हटविणार’ या बातम्या पेरण्याचे कामदेखील झाले होते.सवरा हटाव मोहिमेसाठी अर्थात ते स्वत:देखील जबाबदार आहेत. शासकीय आश्रमशाळांमधील दोन लाख विद्यार्थ्यांना सवरा मंत्री झाल्यापासून शालेय साहित्य, स्वेटर, गणवेश यातील काहीही वेळेत मिळालेले नाही. कंत्राटदारांचे आपसातील वाद, अधिकाऱ्यांचे वैयक्तिक हित यात आदिवासी विकास खात्याचा पार बोजवारा उडाला आहे. सवरा यांनी आपल्या मंत्री कार्यालयात नेमलेल्या पीए, पीएस यांच्या ‘कर्तृत्वा’बद्दल नेहमीच चर्चा असते. विभागातर्फे दरवर्षी आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान केले जातात. गेली दोन वर्षे हे पुरस्कारच देण्यात आलेले नाहीत. विभागाच्या २९ आदिवासी विकास प्रकल्पांमध्ये प्रत्येकी एक आढावा समिती स्थापन केली जाते. त्यात स्थानिक प्रतिष्ठितांचा समावेश असतो. अशा समित्याच सवरांच्या कार्यकाळात अद्याप झालेल्या नाहीत. शेकडो आश्रमशाळांमधील जेवण, राहण्याच्या सुविधा, पुरविण्यात येणाऱ्या वस्तू यातील दर्जामध्ये काहीही फरक पडलेला नाही.