शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

“राहुल गांधींनी कॅट वॉक करायला आषाढी पालखी सोहळ्यात येऊ नये”; भाजप नेत्याची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 15:42 IST

BJP Slams Rahul Gandhi: आजपर्यंत राहुल गांधींना कधी विठ्ठल अथवा पालखी आठवली नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा घेण्यासाठी वारीत येत आहेत, अशी टीका भाजपाने केली आहे.

BJP Slams Rahul Gandhi: १७ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. राज्यभरातून संतांच्या पालख्या पंढरपुराकडे मार्गस्थ झाल्या आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार आणि शिस्तबद्धतीने पालख्या मार्गक्रमण करत आहेत. पंढरपुरातील विठुरायाला भेटण्याची ओढ वारकऱ्यांना लागली आहे. राज्यात एकीकडे वारीचा उत्साह असून, दुसरीकडे राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. यातच राहुल गांधी वारीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून भाजपाच्या माजी खासदारांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून नेते, पदाधिरी वारीत सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा डोळ्यासमोर असल्याने शरद पवार हे वारीत सहभागी होणार असल्याचे वृत्त असून, अशातच राहुल गांधी हेही वारीत सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राहुल गांधी आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रयत्न करत असल्याची माहिती देण्यात येत आहे. भाजपाचे माजी खासदार रणजीत निंबाळकर यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

राजकीय फायदा घेण्यासाठी वारीत सहभाग

पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारने कोट्यवधीचा निधी वारकरी संप्रदायाला दिला आहे. पालखी मार्ग केले तरी याचा राजकीय वापर केला नाही. राहुल गांधी यांनी आषाढी पालखी सोहळ्यात कॅट वॉक करायला येऊ नये. कोणत्याही राजकीय पक्षाने या भोळ्या भाबड्या वारकरी संप्रदायाचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करू नये. आजपर्यंत राहुल गांधी यांना कधी विठ्ठल अथवा पालखी आठवली नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा घेण्यासाठी येण्याच्या चर्चा सुरू केल्या आहेत,  त्याचा निषेध आम्ही करतो, अशी टीका निंबाळकर यांनी केली.

दरम्यान, महाराष्ट्रातील सर्वांत मोठा उत्सव असणाऱ्या आषाढी सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे १३ किंवा १४ जुलै रोजी पंढरपुरात येऊन विठुरायाचे दर्शन घेणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यापूर्वी पालखी सोहळ्यासोबत चालण्याचा आनंदही त्यांना घ्यायचा असून याबाबत प्रयत्न करण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती देण्यात येत आहे.  

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा