शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

Eknath Shinde Group: आता शिंदे गटाने भाजपाचेच पदाधिकारी फोडले; १०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 19:40 IST

ठाकरे गट शिवसेना आणि नुकतेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी फोडल्यानंतर शिंदे गटाने फडणवीसांनाच धक्का दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला धक्का दिल्यानंतर शिंदे गटात राज्यभरातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होऊ लागले होते. यातच शिंदे यांनी राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यास सुरुवात केली. परंतू, आता शिंदे गटाने फडणवीसांनाही धक्का देण्यास सुरुवात झाली आहे. 

शिंदे गटाने दहिसरमध्ये भाजपाचे पदाधिकारी फोडले आहेत. मुंबईत १०० हून अधिक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत या महिला कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. 

सुर्वे यांच्या मतदारसंघात असलेल्या मुंबई वॉर्ड क्र. २५ मध्ये हा पक्षप्रवेश झाला. यामध्ये भाजपाचे माजी वॉर्ड अध्यक्षा देखील होत्या. त्यांच्यासह कार्यकर्त्या महिलांनी शिवसेनेत हा प्रवेश केला. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 माजी नगरसेवक आणि 6 तालुकाध्यक्षांनी  नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केला. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला हा धक्का आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक अशोक गावडे, माजी नगरसेविका स्वप्ना गावडे, सानपाड्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे, कोपरखैरणेचे तालुकाध्यक्ष मोहन पाडळे, घणसोलीचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, सीबीडी बेलापूरचे तालुकाध्यक्ष अरुण कांबळे, रबाळेचे तालुकाध्यक्ष महेश बिराजदार, तुर्भेचे तालुकाध्यक्ष नियाज शेख यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना