शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

Narayan Rane : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार का? नारायण राणेंनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 16:03 IST

BJP Narayan Rane And Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलं आहे. 

यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. याच दरम्यान भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलं आहे. 

दसरा मेळाव्याला तुम्ही जाणार का? असा प्रश्न नारायण राणे (Narayan Rane) यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी यावर मिश्किल उत्तर दिलं आहे. "एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आमंत्रण दिलं तर मी जरूर जाईन" असं राणे म्हणाले आहेत. तसेच उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) मला आमंत्रण दिलं तर मी दसरा मेळाव्याला जाईन. पण उद्धव ठाकरे मला आमंत्रण देणार नाहीत, हे माहिती आहे, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा असा आदेश"

शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा, असा आदेश माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

"...तर त्याचा कोथळा काढल्याशिवाय राहायचं नाही"; शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे. "छत्रपतींनी आपल्याला शिकवलं कोणाच्या पाठीत वार करायचा नाही आणि जर कोणी पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही" असं म्हणत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. शिवसेनेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "एक नेता, एक झेंडा, एक मैदान... एकनिष्ठ शिवसैनिकांचा.. पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळावा! स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर ५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDasaraदसरा