शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याची तुलना पंजाबशी नको, शहराचे नाव खराब होईल असे बोलू नका; मुरलीधर मोहोळांची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 22:57 IST

MP Murlidhar Mohol: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

MP Murlidhar Mohol: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर विविध घटनांमुळे चर्चेत आहे. यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहेत. पोर्शे कार अपघातानंतर एफसी रोडवरील अंमली पदार्थाचे प्रकरण समोर आले. यासंदर्भात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक विनंती केली आहे. पुण्याची तुलना पंजाबशी करू नका, असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. 

पुण्यातील घटनांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. यावर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, विरोधासाठी विरोध नको. शहराचे नाव खराब होईल, असे कोणीही वक्तव्य करू नका, ही विनंती आहे. आम्हांला या शहरातील चुकीच्या घटना थांबवायच्या आहेत. दोषी असणाऱ्यांना सोडणार नाही, असे आश्वासन मुरलीधर मोहोळ यांनी दिले. 

पुण्याची तुलना पंजाबशी नको 

पुण्याची तुलना पंजाबशी नको. आम्ही सर्वांनी जातीने लक्ष घातले आहे. कारवाई होत आहे. याच्यावर १०० टक्के काम करू. या शहराची प्रतिमा खराब होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. शहराचे नाव खराब होईल असे कोणीही वक्तव्य करू नये. भविष्यात असे होणार नाही, याची काळजी घेऊ, असे मोहोळ यांनी सांगितले. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अपघातावर बोलताना मोहोळ म्हणाले की, दुर्दैवी घटना आहे. त्या ठिकाणी गेलो होतो. पावसामुळे ही घटना घडली असल्याचे दिसून येत आहे. चौकशी समिती नेमण्यात आली आहे. जखमी आणि मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जाणार आहे, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

दरम्यान, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.  एका नादुरुस्त विमानामुळे प्रवाशांना त्रास होत आहोत. त्याचा सर्वे होणार आहे, त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यास गती मिळणार आहे. टर्मिनल बांधून तयार आहे, पण संरक्षण खात्याचे मनुष्यबळ कमी होते.  अमित शाह यांना भेटून याबाबत चर्चा केल्यानंतर आता मनुष्यबळ मिळाले आहे. नवीन टर्मिनल काही दिवसांत चालू होणार आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय आहे.  येत्या ८ दिवसांत नवीन टर्मिनल सुरू होईल, असे मोहोळ यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :murlidhar moholमुरलीधर मोहोळ