शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा खासदार हीना गावित अपघातात जखमी, दुचाकीस्वार महिलेला वाचवाताना कार दुभाजकावर आदळून झाला अपघात

By मनोज शेलार | Updated: August 7, 2022 17:50 IST

Heena Gavit: दुचाकीस्वार महिलेला वाचवितांना खासदार डॉ.हीना गावित यांचे चारचाकी वाहन दुभाजकाला धडकल्याने त्यांच्यासह दुचाकीस्वार महिलेसह तीनजण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी नंदुरबारात घडली.

- मनोज शेलारनंदुरबार : दुचाकीस्वार महिलेला वाचवितांना खासदार डॉ.हीना गावित यांचे चारचाकी वाहन दुभाजकाला धडकल्याने त्यांच्यासह दुचाकीस्वार महिलेसह तीनजण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी नंदुरबारात घडली. खासदार गावित यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, खासदार डॉ.हीना गावित या आपल्या वाहनाने रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नंदुरबार येथील एका कार्यक्रमाला जात असतांना हा अपघात घडला.

शहरातील करण चौफुली जवळ असलेल्या देवचंदनगर जवळील रस्त्याने त्या जात असतांना त्यांच्या वाहनासमोर अचानक दुचाकीस्वार महिला आली. चालकाने महिलेला वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता वाहन दुभाजकावर जाऊन आदळले. त्यात खासदार गावित यांना हाताला व पायाला किरकोळ दुखापत झाली. महिला देखील जखमी झाली. स्वत: खासदारांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी महिलेला रुग्णालयात पाठवत त्यांना धीर दिला. त्यानंतर खासदार व त्यांच्या सोबत असलेले रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुभाष पानपाटील हे स्वत: खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले.

टॅग्स :Accidentअपघातnandurbar-pcनंदुरबार