शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांनी बहुजनांसाठी केलेले काम कुणी झाकू शकत नाही - गोपीचंद पडळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 14:00 IST

मविआ सरकारनं धनगरांना लागू केलेल्या योजना बंद केल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्याने होत होता

मुंबई - मागील अनेक वर्षापासून धनगरांचा एसटी आरक्षणाचा प्रलंबित आहे. मात्र भाजपा सरकारच्या काळात जे जे आदिवासींना ते ते धनगर समाजाला मिळेल या धोरणातंर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजासाठी २२ योजना लागू केल्या होत्या. तेव्हाचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात त्यासाठी १ हजार कोटींची आर्थिक तरतूदही केली. त्यानंतर सरकार बदललं आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. 

मविआ सरकारनं धनगरांना लागू केलेल्या योजना बंद केल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्याने होत होता. आता राज्यात पुन्हा भाजपाचं सरकार आले आहे. त्यामुळे धनगरांसाठी बंद केलेल्या योजना पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी पडळकरांनी पाठपुरावा केला. त्याबाबत गोपीचंद पडळकर यांनी ट्विट केलंय की, ‘जे जे आदिवासींना ते ते धनगर समाजाला’या धोरणांतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी लागू केलेल्या २२ योजना प्रस्थापितांनी बंद केल्या होत्या. त्याआता परत लागू करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. तुम्ही बहुजन समाजासाठी केलेलं काम कुणी झाकू शकत नाही असं कौतुक त्यांनी फडणवीसांचं केले आहे. 

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं याबाबत पत्रक काढत मागास बहुजन कल्याण संचलनालयाला कळवलं आहे. त्यात धनगर समाजासाठी लागू करण्यात आलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या ३० जुलै २०१९ च्या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अनुषगांने आदिवासी विकास विभागामार्फत अनुसुचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाजासाठी योजना लागू कराव्यात असं सांगण्यात आले आहे. 

कोणत्या आहेत योजना?

  • धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे, नागपूर व अमरावती या ठिकाणी वसतीगृह निर्माण करणे
  • वसतीगृहापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे
  • धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देणे
  • बेघर कुटुंबीयांना १० हजार घरकुले बांधून देणे
  • आवश्यकता असलेल्या परंतु अर्थसंकल्पात निधी उपलब्ध नसलेल्या योजना राबवण्यासाठी न्युक्लियस बजेट योजना
  • युवक-युवतींना लष्करातील भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक मुलभूत प्रशिक्षण देणे
  • स्टार्ट अप इंडियाच्या योजनेतून समाजातील नवउद्योजकांना सहाय्य करण्यासाठी मर्यादेत निधी उपलब्ध करून देणे
  • होतकरू बेरोजगार तरुणांना स्पर्धा परिक्षेसाठी परिक्षा, निवासी प्रशिक्षण देणे, परीक्षेसाठी आर्थिक सवलती उपलब्ध करणे.  
टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीDhangar Reservationधनगर आरक्षण