शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

बिन टाक्याचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर बारामतीत आल्या तर...; गोपीचंद पडळकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 16:37 IST

५० वर्ष खूप सेवा केली आता तुम्हाला आराम करण्याची सक्त गरज आहे. जनता २०२४ ला सुप्रिया सुळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवणार आहे असं गोपीचंद पडळकरांनी सांगितले.

बारामती - भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं लोकसभा मिशन हाती घेतलंय. त्यात निर्मला सीतारामन यांच्यावर बारामतीची जबाबदारी दिलीय. निर्मला सीतारामन या बिन टाक्याचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. एकदा त्या बारामतीला आल्या तर पवारांना कळणारही नाही. ऑपरेशन कसं झाले आणि भाजपाचा खासदार दिल्लीला कसा गेला अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली आहे. 

गोपीचंद पडळकर म्हणाले की, २२,२३ आणि २४ सप्टेंबरला निर्मला सीतारामन महाराष्ट्रात येणार म्हटल्यावर सुप्रिया सुळे सातत्याने सरकारवर टीका करायला लागल्यात. तुम्ही चिंता करू नका. ५० वर्ष खूप सेवा केली आता तुम्हाला आराम करण्याची सक्त गरज आहे. जनता २०२४ ला सुप्रिया सुळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवणार आहे. पुणे जिल्ह्यात भाजपाचं संघटन कार्यकर्त्यांनी टिकवून ठेवलं. २०१९ ला विश्वासघातानं सरकार बनवलं. जेव्हा एखाद्याचं लुबाडून घ्यायचं. हिसकावून घ्यायचं तेव्हा बारामतीकरांना आनंद असतो. जनतेने निवडून दिलेल्या सरकारप्रमाणे शपथविधीनंतर पहिल्या अधिवेशनात त्यावेळी सुप्रिया सुळे वरमाई असल्यासारख्या फिरत होत्या. राज्यात गणपती बसले आहेत. आता अनेकठिकाणी विसर्जन सुरू आहे. गणपती दरवर्षी येत असतात. परंतु २०२४ ला पवारांचं विसर्जन करण्यासाठी राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आवर्जुन संघटनेच्या कामाची सुरुवात करायला बारामतीत आलेत असं पडळकरांनी म्हटलं. 

हा पवारांचा बालेकिल्ला नाही तर टेकडीबारामती लोकसभेत परिवर्तन करण्याची वेळ आली आहे आणि हे परिवर्तन निश्चित होणार आहे. हे फार अवघड काम नाही. हा किल्ला, बालेकिल्ला म्हटलं जातं पण ही पवारांची टेकडी आहे. केवळ वातावरण निर्मिती केली जात आहे. राष्ट्रवादीचं राजकारण पोलिसांवर चालतं. तहसिलदार, प्रांत, तलाठी यांच्यावर राजकारण चालतं. त्यापलीकडे राजकारण जात नाही असा आरोप गोपीचंद पडळकरांनी केला. 

...तर दुसरा पर्याय नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगाच्या पाठिवर ताठ मानाने उभा आहे. नरेंद्र मोदींना देशभरातील अनेक मतदारांनी २ वेळा देशाची सेवा करण्याची संधी दिली. त्यात बारामती मतदारसंघ नव्हता त्याची खंत येथील मतदारांना वाटत आहे. त्या भावना लोकं आम्हाला बोलून दाखवतात. हीच खंत वाटून घ्यायची नसेल तर २०२४ ला कमळ चिन्हावरील बटण दाबून लोकसभेला भाजपाचा खासदार पाठवावा लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं आवाहन गोपीचंद पडळकरांनी कार्यकर्त्यांना केले. 

राष्ट्रवादीचं खरे दुखणं हेच सत्तेत असताना विरोधात बोलणाऱ्यांवर मोक्के लावले गेले. चळवळीत असणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल होतात. माझ्यावर किती गुन्हे नोंद केलेत. महिलांच्या शरीरावर जेवढे दागिने असतात तेवढे राजकीय नेत्यांवर गुन्हे हे आपले दागिने असतात. त्याशिवाय राजकारणात पुढे जाऊ शकत नाही. भाजपाचा कार्यकर्ता हा प्रस्थापित व्यवस्थेविरोधात ताठमानेने लढतो आणि जिंकतोही. एकनाथ शिंदेंसारख्या मराठा समाजातील व्यक्तीने इतके बंड केले आणि त्यांच्यामागे भाजपानं १०५ आमदारांची ताकद देत मुख्यमंत्रिपदी बसवलं हे राष्ट्रवादीचं खरे दुखणं आहे असा टोला गोपीचंद पडळकरांनी लगावला. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBJPभाजपा