शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या मंत्र्यांना महिन्यातून किमान एकदा जावे लागणार खेड्यात मुक्कामी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 06:32 IST

कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मंत्र्यांकडची कामे मार्गी लागणार

शिर्डी : भारतीय जनता पक्षाच्या सर्व मंत्र्यांना आता महिन्यातून किमान एकदा एका खेड्यात जाऊन मुक्काम करावा लागणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या तसेच जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत ही माहिती दिली.

भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या बैठकीत प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे तसेच केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यावेळी उपस्थित होते. 

बावनकुळे म्हणाले, की खेड्यातील माणसांच्या समस्या समजून घ्यायच्या असतील तर पक्षाच्या मंत्र्यांना खेड्यात जावेच लागेल. तेथे मुक्काम करावा लागेल, लोकांशी संवाद साधावा लागेल. भाजपच्या प्रत्येक मंत्र्यांच्या कार्यालयात एक ओएसडी असा असेल, की जो फक्त पक्ष संघटनेशी संबंधित कामांकडे आवर्जून लक्ष देईल. 

मंत्र्यांना त्याविषयी अवगत करील आणि मंत्री पक्षजणांची कामे लवकरात लवकर होतील याकडे जातीने लक्ष देतील. पक्षाचा कार्यकर्ता आणि पक्षाचे पदाधिकारी हा आपला कणा आहे. त्याने सामान्य माणसाशी |संबंधित आणलेली महत्त्वाची कामे झालीच पाहिजेत, याकडे मंत्री विशेष लक्ष देतील, असे बावनकुळे म्हणाले.

सदस्य नोंदणीचे लक्ष्य पूर्ण कराप्रदेश भाजपने दीड कोटी सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष निश्चित केले आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ४५ लाख सदस्य झाले आहेत, याबद्दल बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली आणि आपला स्कोअर २० जानेवारीपर्यंत सुधारा, असे सगळ्यांना सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशाचे श्रेय पक्ष संघटनेला आहे. त्यासाठी सर्वांनी अहोरात्र मेहनत केली. थोडा शीण आला असेल; त्यामुळे त्याचा परिणाम सदस्य नोंदणीवर झाला तरी आता येत्या आठ-पंधरा दिवसांत टार्गेट पूर्ण होईल, याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा