हजारीबाग(झारखंड) : स्थानिक न्यायालयाने झारखंड वीज मंडळाच्या एका अधिका:यावर हल्लाप्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि इतर 54 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
सिन्हा आणि इतरांनी जामीन घेण्यास नकार दिल्यानंतर न्यायदंडाधिकारी आर.बी. पाल यांनी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. वीज टंचाईविरुद्ध भाजपाच्या आंदोलनादरम्यान सिन्हा आणि इतरांनी आपल्याला बांधून ठेवले होते,असा आरोप मंडळाच्या हजारीबाग शाखेचे व्यवस्थापक धनेश झा यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला होता. एफआयआरनंतर सोमवारी सिन्हा यांना अटक करण्यात आली होती.
झा यांना दोरीने बांधण्याचे आदेशच आपणच पक्षाच्या महिला कार्यकत्र्याना दिले होते, अशी कबुली सिन्हा यांनी माध्यमांसमक्ष दिली होती. (वृत्तसंस्था)