शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी ‘ज्योतिषी’ म्हणून उडवली होती खिल्ली, आता रावसाहेब दानवेंनी दिलं असं  उत्तर; म्हणाले…

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 25, 2020 13:53 IST

“दोन महिन्यात सरकार येईल. पण, सरकार कसं येईल? यासंदर्भातील नियोजन तुम्हाला कसं सांगू?” असं दानवे यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांची 'ज्योतिषी' म्हणून खिल्ली उडवली होती.या राज्यातील कारभारावर जनता नाराज आहे - दानवेदोन महिन्यात सरकार येईल. पण, सरकार कसे येईल? यासंदर्भातील नियोजन तुम्हाला कसे सांगू? - दानवे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांची 'ज्योतिषी' म्हणून खिल्ली उडवली होती. यावर दानवे यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. रावसाहेब दानवे यांनी एका एका कार्यक्रमात बोलताना राज्यात येत्या दोन महिन्यांत भाजप सरकार सत्तेवर येईल, असा दावा केला होता. यासंदर्भात पवारांना विचारले असता, "त्यांनी सांगितले आहे तर तसे होईल. ज्योतिष शास्त्रातील जाणकार म्हणून त्यांचा परिचय करून दिलाय परंतु सामान्य माणूस सोबत असल्यावर कुरधुड्या ज्योतिषाचे काही चालत नाही, असा टोला पवारांनी लगावला होता. त्यावर आता दानवे यांनी उत्तर दिले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

यासंदर्भात बोलताना दानवे म्हणाले, “माझ्यावर टीका करण्याचा शरद पवारांना आधिकार आहे. ते या महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मात्र, एक गोष्ट मला समजते, की या राज्यातील कारभारावर जनता नाराज आहे. हा माझ्या भविष्याचा प्रश्न नाही.” 

यावेळी दानवे यांना पुन्हा एकदा राज्यात भाजपाचे सरकार येणार असल्याच्या दाव्यासंदर्भात विचारले असता, “दोन महिन्यात सरकार येईल. पण, सरकार कसे येईल? यासंदर्भातील नियोजन तुम्हाला कसे सांगू?” असे दानवे म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार? - रावसाहेब दानवे हे अनेक वर्षे विधीमंडळात व संसदेत काम करत आहेत. पण ठीक आहे मला त्यांचा हा गुण माहित नव्हता. साधारणतः खेड्यापाड्यात शेतकर्‍यांमध्ये काम करणारा सहकारी म्हणून त्यांच्याकडे पहात होतो. पण उद्याचे चित्र सांगण्याचा अभ्यास आणि तयारी मला माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी सांगितले आहे, तर तसे होईल. ज्योतिष शास्त्रातील जाणकार म्हणून त्यांचा परिचय करून दिलाय परंतु सामान्य माणूस सोबत असल्यावर कुरधुड्या ज्योतिषाचे काही चालत नाही, असे पवार म्हणाले होते.

काय म्हमाले होते रावसाहेब दानवे -राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या पक्षातील वेगळ्या विचारांचे नेते सहभागी असल्याने त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद आहेत. कोणाचा कोणाला पायपूस नाही. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत येईल, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा