शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांवर नवाब मलिकांचा गंभीर आरोप, पंकजा मुंडे म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 12:54 IST

'नवाब मलिकांनी लवंगी लावली, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार.'

मुंबई: ड्रग्स प्रकरणावरुन नवाब मलिक यांनी आज थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ड्रग्स पेडलर जयदीप राणा याचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. मलिकांनी आज सकाळी अमृता फडणवीस आणि त्यानंतर देवेंद्र यांचा एका व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केला आणि पत्रकार परिषदेत फडणवीसांचे ड्रग पेडलरसोबत संबंध असल्याचा आरोप केला. या आरोपांवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलर जयदीप राणा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत आणि फडणवीसांच्या इशाऱ्यावरुनच राज्यात ड्रग्सचा खेळ सुरु असल्याचा गंभीर आरोप फडणवीसांवर करण्यात आलाय. मलिकांच्या या आरोपांवर आता भाजप नेते आक्रमक झालेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नवाब मलिकांचा हा आरोप अत्यंत हास्यास्पद असल्याचं म्हटलं. 'ज्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात एवढं चांगलं काम केलं, त्या मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचा आरोप केला जातोय. हा आरोप अत्यंत हास्यास्पद आहे', असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 

'दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार...'नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना तातडीने पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. त्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक सध्या कोणत्या मानसिकतेमध्ये आहेत, हे सर्वांना माहिती आहे. नवाब मलिक यांनी लंवगी फटाकडी लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहे. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याबाबत आणि ड्रग्सबाबतही बोलू नये. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन उघड करणार असून, याचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनाही देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

'हे फक्त ठाकरे-पवारच करू शकतात'फडणवीसांवर केलेल्या आरोपानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. 'एवढ्या खालच्या पातळीवरचे आरोप करण्याची नवाब मलिकांची कॅपेसिटी नाही, हे केवळ ठाकरे-पवारच करू शकतात, असं सोमय्या म्हणाले. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम नातेवाईकांच्या खात्यात वर्ग केली आहे. ईडी आणि आयकर विभागाच्या धाडीतून हे सिद्धही झालंय. पण, त्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच समीर वानखेडे आणि अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnawab malikनवाब मलिकKirit Somaiyaकिरीट सोमय्या