शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पुढील दहा ते पंधरा वर्ष हटत नाही”; भाजप नेत्याला ठाम विश्वास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 12:00 IST

Maharashtra News: शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल अशी मला खात्री असल्याचा विश्वास भाजप नेत्याने व्यक्त केला आहे.

Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त करणारे बॅनर झळकावण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही अजितदादा मुख्यमंत्री झाले, तर आनंदच होईल. सर्वांचीही तशी इच्छा असल्याचे म्हटले होते. यावरून भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी टोला लगावला असून, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पुढील दहा ते पंधरा वर्ष तरी हटत नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल ना होईल हा दुसरा भाग आहे. परंतु त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री कोण होईल याचे नाव पहिले निश्चित करावे. कुटुंबामध्ये कोणाला ते नेतृत्व देताय आणि मग त्यावरती कारवाई करावी. पक्ष जे चालवतात त्यांच्या तोंडून तो निर्णय आला तर त्यावर मी भाष्य करेन, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. 

अजित पवार ज्येष्ठ नेते, त्यांचे काम अतिशय चांगले

 पुढे बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की, राहिला प्रश्न अजित पवार यांच्या नेतृत्वाचा, ते या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे काम अतिशय चांगला आहे. त्यांनी नेतृत्व करावे किंवा नाही करावे हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकार असून ते पुढील दहा ते पंधरा वर्षे हटत नाही. ज्यांना पदे वाटून घ्यायची आहेत. त्यांनी घरात बसून आपापसामध्ये वाटून घ्यावी, असा खोचक टोला सुजय विखे पाटील यांनी रोहित पवार यांना लगावला आहे.

मुख्यमंत्री असताना कधी महाराष्ट्र पाहिला नाही, पद गेल्यावर दौरे करतायत

ज्या महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री होतो तो महाराष्ट्र दिसतो कसा हे पाहण्यासाठी ठाकरे सध्या राज्याचा दौरा करत आहे. पद गेल्यानंतर महाराष्ट्राची स्थिती पाहायला त्यांना वेळ मिळाला आहे. मात्र, मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कधी पाहिलाच नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना निवांत वेळ दिला आहे, अशी खोचक टीका सुजय विखे-पाटील यांनी केली आहे. 

दरम्यान, विरोधकांकडून सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. यावर भाष्य करताना ते म्हणाले की, यावर कॅबिनेटमध्ये चर्चा सुरु असते. NDRFच्या  निकषापेक्षा जास्त मदत करण्याबाबत बागायत, जिरायत क्षेत्रानुसार मदत देणे याबाबत चर्चा सुरु आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल अशी मला खात्री आहे, असा विश्वास सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस