शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

...  मग आयर्न लेडीची 'आर्यन लेडी' होणारच; भाजपचा शरद पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 10:58 IST

Sharad Pawar : इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना अभिवादन करताना शरद पवार यांनी त्यांचा उल्लेख आर्यन लेडी असा केला होता. 

Bjp On Sharad Pawar : इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी ट्विटरद्वारे त्यांना अभिवादन केलं. यावेळी शरद पवार यांनी इंदिरा गांधी यांचा उल्लेख आयर्न लेडी ऐवजी आर्यन लेडी असा केला. यावरून भाजपनं शरद पवार यांना टोला लगावला. भाजप महाराष्ट्रचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

"असे पोटातले ओठावर येते पाहा. इंदिरा गांधींनी १९८० साली तुमचं सरकार बरखास्त केलं होतं. त्याचा राग मनात असणं स्वाभाविक आहे. दुसरीकडे सेलिब्रिटीपुत्र आर्यन शाहरूख खानबद्दलचा कळवळा. जणू त्याला वाचवणं हा राष्ट्रवादीचा अजेन्डाच. मग आयर्न लेडीची आर्यन लेडी होणारच," असं म्हणत उपाध्ये यांनी टोला लगावला.

काय म्हटलं होतं पवार यांनी? "गरीबी हटाओचा नारा देत सर्व घटकांच्या प्रगतीसाठी नवनवीन योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या, आपल्या कणखर नेतृत्वाने जागतिक राजकारणात भारताला सक्षम बनवणाऱ्या, भारताच्या 'आर्यन लेडी' स्व. इंदिरा गांधी यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन!," असं ट्वीट शरद पवार यांनी केलं होतं. 
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारIndira Gandhiइंदिरा गांधी