शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

नाराज झालेल्या एकनाथ खडसेंना फडणवीसांचा सल्ला; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 21:53 IST

गेल्या काही दिवसांपासून फडणवीस खडसेंच्या निशाण्यावर

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षावर नाराज असलेले भाजपा नेते एकनाथ खडसे विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या मनातील खदखद वारंवार बोलून दाखवत आहेत. काल बीडमधील परळीत गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून खडसेंनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला. त्यावर आज फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना फडणवीसांनी खडसेंना प्रेमाचा सल्लादेखील दिला. एकनाथ खडसेंना तिकीट नाकारण्याचा निर्णय दिल्लीतून झाला. त्यांचं तिकीट का कापण्यात आलं, याबद्दल मला कल्पना नाही. केंद्रीय नेतृत्त्वच त्यांना यामागील कारणं सांगू शकतं. त्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं. एकनाथ खडसेंसोबत मी अनेक वर्ष कामं केलं आहे. मात्र काल त्यांनी ज्या पद्धतीनं भाषण केलं, तसं ते बोलले नसते तर बरं झालं असतं. कारण तो कार्यक्रम आणि ते व्यासपीठ त्या प्रकारचं नव्हतं, अशा शब्दांत फडणवीसांनी खडसेंच्या भाषणाबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजपात नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. जिंकल्यावर जसे हार मिळतात. तसंच पराभव झाल्यानंतर चार शिव्याही खाव्या लागतात. तुम्ही जिंकता तेव्हा सगळं गौण असतं, असं ते पुढे म्हणाले.गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे सातत्यानं फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत आहेत. त्यावरुन फडणवीसांनी खडसेंना प्रेमाचा सल्ला दिला. खडसेंसोबत अनेक वर्षं काम केल्यानं मी त्यांना अगदी जवळून ओळखतो. अनेकदा त्यांच्या मनात काहीच नसतं. मात्र बोलताना ते बोलून जातात. यामुळे त्यांचं बऱ्याचदा राजकीय आणि वैयक्तिक नुकसान होतं. या गोष्टी लक्षात ठेवल्यास आणि त्यानुसार काळजी घेतल्यास त्यांना फायदा होईल, असा सल्ला फडणवीसांनी दिला.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपा