शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

MPSC Exam Postponed: परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा; देवेंद्र फडणवीसांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 18:05 IST

MPSC Exam Postponed - राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपने या निर्णयाविरोधात ठाकरे सरकारला घेरले आहे.

ठळक मुद्देmpsc परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाचे राज्यभर पडसादपुणे, कोल्हापूर, यवतमाळ, सांगली यांसारख्या अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावरराष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपने या निर्णयाविरोधात ठाकरे सरकारला घेरले

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर आलेली MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, पुण्यात हजारो विद्यार्थी या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. MPSC परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. कोणतीही पूर्वकल्पना न देता सरकारने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या परीक्षांवरून आता राजकारण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपने या निर्णयाविरोधात ठाकरे सरकारला घेरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही MPSC परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. (bjp leader devendra fadnavis demands that withdraw decision about mpsc exam postponed)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. यासंदर्भात फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. ''एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणार्‍या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा'', अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. वय निघून जाते, संधी हुकतात, या परीक्षा घेतल्याच पाहिजेत. सरकारचा निर्णय चुकीचा आहे, आता ज्या परीक्षा आहेत, त्या परीक्षा आताच व्हायला हव्यात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

आपण एमपीएससीच्या परीक्षा अनंत काळासाठी पुढे ढकलू शकत नाही. काही परीक्षार्थींमुळे सर्व विद्यार्थ्यांना वेठीला धरणं चुकीचे आहे. आतापर्यंत या परीक्षा चार वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. समजा काही कारणांमुळे काहीजण परीक्षा देऊ शकले नाहीत. तर त्यांना पुढे संधी देता येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

"हे सरकार आमच्या आयुष्याशी खेळत आहे!"; पुण्यात 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट 

राजकीय वातावरण तापले

अधिवेशन आणि लग्न होतात मग MPSC परीक्षा का नाही, अशी विचारणा करत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एमपीएसीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी परीक्षेच्या मुद्द्यावर आपली भूमिका व्यक्त केली आहे. तसेच MPSC ची परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आली आहे, हा चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यांसह चंद्रकांत पाटील, विजय वड्डेटीवार, नितेश राणे यांसह अनेक नेत्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाला विरोध करत नाराजी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, पुण्यात सुरू झालेला विद्यार्थ्यांच्या विरोधाचे पडसाद राज्यभर उमटल्याचे पाहायला मिळत असून, कोल्हापूर, जळगाव, नांदेड, सांगली, यवतमाळ, हिंगोली, अकोला, वाशिम यांसारख्या अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकारBJPभाजपा