शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'ताई, मन मोठं करा! अजितदादा तुमचं तरी ऐकतात का पाहू?'; भाजपाचा सुप्रिया सुळेंना टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 10:40 IST

BJP Keshav Upadhye And Supriya Sule : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

मुंबई - केंद्र सरकारने कोट्यवधी गरीब जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गुरुवारी लोकसभेत केली आहे. गरजेच्या वस्तूंची भाववाढ आणि महागाई या विषयावरील चर्चेमध्ये सुळे यांनी इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला. खाद्यतेलाचे भावही गगनाला भिडले असून सर्वसामान्यांना ते परवडेनासे झाले आहेत असं सुळे यांनी म्हटलं आहे.

सर्वसामान्यांना महागाईची झळ बसली असून केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसवरील कर कमी करावे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असं देखील सुळे यांनी म्हटलं आहे. यावरून भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. 'ताई, मन मोठं करा! अजितदादा तुमचं तरी ऐकतात का पाहू?' असं म्हणत भाजपानेसुप्रिया सुळे यांना टोमणा मारला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

"सुप्रिया सुळे ताई, मन मोठं करा! केंद्राने अगोदरच कर कपात करून इंधन दर कमी केले आहेत. आता पाळी आहे जनतेच्या खिशातून ओरबाडणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी वसुली सरकारची! केंद्राच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याऐवजी हा सल्ला थेट अजित पवार यांना द्या. ते तुमचं तरी ऐकतात का पाहू?" असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. केशव उपाध्ये यांनी याआधी देखील ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपाPoliticsराजकारण