शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

“बाळासाहेबांच्या नावाखाली आणखी किती काळ दिशाभूल करणार?”; भाजपचा शिवसेनेला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 15:54 IST

शिवसेनेनं आधी उन्हात राणा दाम्पत्यांसाठी घराबाहेर बसलेल्या आजीबाईंच्या नातवाला तरी नोकरी द्यावी, असा टोला भाजपने लगावला आहे.

मुंबई: १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी एक टीझर जारी केला होता. तसंच आता त्यांनी एक पोस्टरही जारी केलं आहे. ‘हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व’ असल्याचं शिवसेनेनं त्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. शिवसेनेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. यावरून आता भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. बाळासाहेबांच्या नावाखाली आणखी किती काळ दिशाभूल करणार आहात? असा थेट सवाल भाजपने विचारला आहे. 

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एकामागून एक ट्विट करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ‘हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व’ असा हुंकार देणाऱ्या शिवसेनेनं आधी उन्हात राणा दाम्पत्यांसाठी घराबाहेर बसलेल्या आजीबाईंच्या नातवाला तरी नोकरी द्यावी, असा टोला केशव उपाध्ये यांनी यावेळी लगावला आहे. 

त्यांच्या हाताचं काम लुबाडून घेणाऱ्यांनी रामाचं नाव घेणंही पाप 

एसटी कर्मचाऱ्यांनी ५ महिने संप पुकारला. अनेक कर्मचाऱ्यांचे डोळ्यादेखत आयुष्य संपवलं. त्यांच्या हाताचं काम लुबाडून घेणाऱ्यांनी रामाचं नाव घेणंही पाप ठरेल. बॅनरवर हिंदुत्व शब्द लिहिला परंतु चेहऱ्यावर असलेला पुरोगामी बुरखा उतरवला. ‘ह्दयात सत्ता आणि डोक्यात सत्तेची हवा’ असणाऱ्या मुख्यमंत्रिपदासाठी भ्रष्टवाद्यांशी हातमिळवणी करून हिंदुत्व कधीच सोडलं. आता केवळ उरला आहे तो केवळ दिखावापणा. बाळासाहेबांच्या नावाखाली आणखी किती काळ दिशाभूल करणार आहात? अशी विचारणा केशव उपाध्ये यांनी केली आहे. 

दरम्यान, आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, १४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे. पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असं नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत, असं उद्धव ठाकरे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते. यानंतर आता शिवसेनेने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला असून, यावर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटोही लावण्यात आला आहे. तसंच ही सभा कुठे आणि किती वाजता आयोजित करण्यात आली असून ‘यायलाच पाहिजे’ असंही  त्यावर नमूद करण्यात आलंय. 

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा