शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळेंचं एक विधान अन् शिवसेना-भाजपा युतीत होणार स्फोट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 08:46 IST

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा व्हिडिओ चर्चेत आल्यानंतर सर्व सोशल माध्यमातून तो हटवण्यात आला.

मुंबई - राज्यात मागील वर्षी झालेल्या सत्तांतरात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. शिवसेनेच्या पडलेल्या फुटीमुळे मुख्यमंत्रिपदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले. इतकेच नाही तर खरी शिवसेना कुणाची हा प्रश्नही उपस्थित झाला. याचे कारण म्हणजे शिवसेनेच्या तब्बल ५५ पैकी ४० आमदारांनी आणि १३ खासदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. शिंदे-ठाकरे संघर्षावर दोन्ही बाजूची कागदपत्रे तपासून निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कौल देत शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची परवानगी दिली. 

मात्र ठाकरेंविना शिवसेना चालवणं आता एकनाथ शिंदेंसमोर सगळ्यात मोठे आव्हान आहे. भाजपासोबत शिवसेना राज्यातील सत्तेत आहे. त्यात मुख्यमंत्रिपदही शिवसेनेकडे आहे. आता पुढील विधानसभा निवडणुकीला १ वर्ष शिल्लक असताना शिवसेना-भाजपा किती जागा लढवतील यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे. मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. भाजपाच्या प्रसिद्धी प्रमुखांच्या बैठकीत बावनकुळे यांनी हे वक्तव्य केले आहे. 

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?२०२४ च्या निवडणुकीत आपल्या जागा शंभर टक्के ज्या काही १५०-१७० येतील. पण आपण २४० जागा लढवण्याच्या विचारात आहोत. कारण शिंदेच्या शिवसेनेकडे ५० जागा आहेत. त्यावरती त्यांच्याकडे कुणी नाही. २४० जागा लढल्या तर अशावेळी तुम्हाला तुमची टीम अलर्ट करावी लागेल. तुम्हाला खूप काम आहे असं विधान बावनकुळेंनी प्रसिद्धी प्रमुखांच्या बैठकीत केले आहे.

भाजपाची सारवासारव  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा व्हिडिओ चर्चेत आल्यानंतर सर्व सोशल माध्यमातून तो हटवण्यात आला. कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी असं विधान केल्याचं म्हटलं अशी सारवासारव नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र भाजपाचा हा अंतर्गत कार्यक्रम होता. त्यात माध्यमांना प्रवेश नव्हता. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी केलेले विधान हे भविष्यात या युतीचं चित्र कसं असू शकते हे स्पष्ट करणारे दिसते. 

विरोधकांना आयतं कोलीतअद्याप विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नसल्याचं भाजपाकडून सांगण्यात येत असले तरी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी बसलेल्या जबाबदार व्यक्तीने केलेले विधान निश्चित भविष्यातील युतीच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट करणारे आहे. त्यात बावनकुळेंच्या विधानाचा आधार घेत विरोधकांकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची कोंडी करण्यात येऊ शकते. बावनकुळेंचे विधान विरोधकांना शिंदेविरोधात मिळालेले आयतं कोलीत असल्याचंही म्हटलं जात आहे.  

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेEknath Shindeएकनाथ शिंदे