शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

Pravin Darekar: विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल; भाजपा अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 10:05 IST

आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सहकार विभागाची 'मजूर' असल्याचे भासवून वर्षानुवर्षे फसवणूक करणारे आमदार व विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती

मुंबई- राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांच्यासमोरील अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. दरेकर यांच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. दरेकर बोगस मजूर असल्याचं दाखवत मुंबई बँक, हजारो ठेवीदार आणि सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे(AAP Dhananjay Shinde) यांनी करत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

धनंजय शिंदे यांनी केलेल्या आरोपात असं म्हटलंय की, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे बोगस 'मजूर' असल्याचे व मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत आहेत. मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात प्रवीण दरेकर हे बोगस मजूर असूनही मुंबई बँकेचा अध्यक्ष होते. २०१४-१५ ते २०१९- २० या काळात मुंबई बँकेत प्रवीण दरेकर व गँगने जवळपास २००० कोटींचा आर्थिक घोटाळा व नियम धाब्यावर बसवून काम केल्याचे सहकार विभागाच्या चौकशी अहवाल व चाचणी लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणाताही 'पेन ड्राईव्ह बॉम्ब' न देता आम्ही आपणास थेट हे अहवालच देण्यास तयार आहोत असं त्यांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटलं आहे.

आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सहकार विभागाची 'मजूर' असल्याचे भासवून वर्षानुवर्षे फसवणूक करणारे आमदार व विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी मजूर म्हणून प्रवीण दरेकर याना अपात्र घोषित केले. त्यानंतर त्यांचा जबाब ही पोलिसांनी नोंदवला तसेच सर्व कागदपत्रे सहकार विभागाने देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. याबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. शेवटी आम्ही जनआंदोलन करण्याची तयारी सुरु केली तेव्हा आज दोन महिन्यांनी मुंबई बँकेच्या बोगस व बनावट मजुरावर गुन्हा दाखल झाला आहे असं धनंजय शिंदे यांनी सांगितले.

प्रवीण दरेकर यांची ज्या 'प्रतिज्ञा सहकारी मजूर संस्थे'त मजूर म्हणून नोंदणी आहे, तेथे कागदोपत्री दरेकर हे 'रंगारी' मजूर असल्याचे दिसते. भ्रष्टाचाराचा बराच रंग (चुना) त्यानी गेले अनेक वर्ष मुंबई बँकेला लावला आहे. सहकार विभागाच्या अहवालानुसार प्रतिज्ञा मजूर संस्थेतील मजूर म्हणून नोंद असलेले जवळपास सर्व सदस्य हे बोगस मजूर आहेत. त्यामुळे सहकार विभागाने प्रतिज्ञा मजूर संस्थेचे पाच वर्षांचे लेखा परीक्षण करून मागील पाच वर्षात प्रवीण दरेकर या बोगस व श्रीमंत मजुराने नेमकी किती मजुरीची कामे केली व किती मजुरी यासाठी त्याना मिळाली याचा लेखाजोखा मांडावा अशी आम आदमी पार्टीची मागणी केली आहे.

दरम्यान, जर आपणास पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या ना खाऊंगा ना खाने दुंगा, भ्रष्टाचार मुक्त ही भूमिका मनापासून मान्य असेल तर आपण प्रवीण दरेकर याची तात्काळ पक्षातून हकालपट्टी कराल. अन्यथा पंतप्रधान मोदी यांची भूमिका आपणास मान्य नाही असे महाराष्ट्रातील जनता मानल्याशिवाय राहाणार नाही. आयात दरेकरांना भाजपने आतातरी नारळ द्यावा आणि ओरिजनल भाजपच्या चांगल्या आमदाराला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद द्यावे अशी मागणी धनंजय शिंदे यांनी केली आहे.

टॅग्स :AAPआपpravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपा